शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:03 IST

Electric Scooter Sales: ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे.

इलेक्ट्रीक टू व्हीलर क्षेत्रात डिसेंबरमध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे. डिसेंबरमध्ये बजाजने ओला ईलेक्ट्रीक स्कूटरला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. परंतू, जर पूर्ण वर्षाच्या विक्रीच्या आकड्यांकडे पाहिले तर ओलाच्या तुलनेत बजाज, टीव्हीएस, एथर कुठे म्हणजे कुठेच नाहीत. 

ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. यामुळे ओलाला मोठा बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे बजाजने मिळविलेला पहिला क्रमांक किती काळ टिकतो हे देखील या बुस्टवर अवलंबून आहे. 

२०२४ मध्ये १२ महिन्यांत ओलाने ४ लाखांहून अधिक स्कूटर विकल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बजाज नाही तर टीव्हीएस आहे. टीव्हीएसने २.२० लाख आयक्यूब विकल्या आहेत. २०२४ मध्ये एकूण 11,48,529 ईलेक्ट्रीक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यात ओलाचा खूप मोठा वाटा आहे. 

बजाजने १२ महिन्यांत १.९३ लाख चेतक विकल्या आहेत. एथरने मागील वर्षात 1,26,174 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. हिरोच्या विडा ब्रँडने 43,695 स्कूटर विकल्या आहेत. ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटी प्राइवेट लिमिटेड ने 35,057 स्कूटर विकल्या आहेत. बीगौस ऑटो प्राइवेट लिमिटेड ने 18032 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. कायनेटीकने 11,457 इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकल्या आहेत. रिव्होल्टने 9956,  बाउंस इलेक्ट्रिकने 6972, ओकाया ईवीने  58615 स्कूटर विकल्या आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर