शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ओला इलेक्ट्रिकचा धमाका! ५०१ किमी रेंजची Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची कपात; आता नवीन किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:53 IST

Ola Electric News: स्वदेशी ४६८० भारत सेलचे उत्पादन वाढल्यामुळे ओलाने Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची मोठी कपात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विक्रीच्या आकड्यांत झपाटून मार खाल्लेल्या ओला इलेक्ट्रीकने आधी सेवा सुधरविण्यास सुरुवात केली होती. नुकत्याच संपलेल्या मार्चमध्ये ओलाने नाही म्हणायला १० हजारांचा आकडा गाठला आहे. अशातच कंपनीचे मालक भाविश अग्रवाल यांनी नवीन घोषणा केली आहे. 

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने 'प्राइस वॉर' सुरू केले आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय Roadster X+ (9.1 kWh) या व्हेरिएंटच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी १,८९,९९९ रुपये असलेली या बाईकची किंमत आता थेट १,२९,९९९ रुपयांवर आली आहे. Roadster X+ 9.1 kWh हे मॉडेल ओलाच्या लाइनअपमधील सर्वात पॉवरफुल बॅटरी बॅकअप असलेल्या बाईक्सपैकी एक आहे. एका चार्जमध्ये ही बाईक ५०१ किमीपर्यंत अंतर कापू शकते. 

यात क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड आणि मोठी टचस्क्रीन डिस्प्ले सारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक अवघ्या २.७ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तास वेग पकडू शकते.

किंमत कपातीचे 'स्वदेशी' गणितअग्रवाल यांच्या दाव्यानुसार ओला इलेक्ट्रिकने आता स्वतःच्या 'गीगाफॅक्टरी'मध्ये ४६८० भारत सेलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. यापूर्वी हे सेल आयात करावे लागत होते किंवा उत्पादनाचा खर्च जास्त होता. मात्र, आता देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने बॅटरी पॅकचा खर्च कमी झाला आहे. याचा थेट फायदा कंपनीने ग्राहकांना दिला असून, या मॉडेलची किंमत १,८९,९९९ रुपयांवरून थेट १,२९,९९९ रुपयांवर (एक्स-शोरूम) आणली आहे.

काय आहे '४६८० भारत सेल'?हा एक सिलिंडरच्या आकाराचा मोठा बॅटरी सेल आहे, जो टेस्लाच्या तंत्रज्ञानाशी मिळताजुळता आहे. ओला हा सेल भारतात बनवणारी पहिली कंपनी ठरली आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि चार्जिंगचा वेगही सुधारतो.

ग्राहकांसाठी मोठी संधीसुरुवातीला मोठ्या आघाडीवर असलेल्या ओला इलेक्ट्रीकला सर्व्हिस न दिल्याने मोठा फटका बसला होता. दुरुस्त न झाल्याने अनेकांच्या गाड्या आज भंगारात गेलेल्या आहेत. लोकांनी पेट्रोलवरील पैसे वाचविण्यासाठी ओलाच्या स्कूटर खरेदी केल्या होत्या. परंतू, कंपनी सर्व्हिस देत नव्हती. यामुळे अनेकांनी आपल्या गाड्या पेटविल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. नाचक्की होत असताना कंपनी काही केल्या सुधरायला तयार नव्हती. हे युद्ध स्टँडअप कॉमेडिअनने सोशल मीडियावर नेले आणि त्यानंतर केंद्राच्या मंत्रालयाला देखील याची दखल घ्यावी लागली होती. यातच ओलाचे गोवा, महाराष्ट्रात विक्री केंद्रे बंद करण्यात आली. याचा फटका कंपनीच्या विक्रीवर बसला आणि ही विक्री कधी चार हजारांवर आली कंपनीलाही समजले नाही. ओलाच्या स्कूटरच्या किंमतीदेखील दीड-दोन लाखांवर देल्या होत्या. याचाही फटका कंपनीला बसला होता. यामुळे कंपनीने आता पुन्हा डिस्काऊंट देण्याच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ola Electric Slashes Roadster X+ Price by ₹60,000!

Web Summary : Ola Electric dramatically cuts Roadster X+ price to ₹1,29,999, boosted by local battery production. The 501km range scooter features advanced tech. This move aims to regain market share after service issues impacted sales.
टॅग्स :Olaओला