शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बाबो! Ola Electric ची चांदीच चांदी; एका दिवसात विकल्या 600 कोटींच्या स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:25 IST

Ola Electric Scooter : प्रति सेकंद चार ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवार 15 सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासून कंपनीला 600 कोटी रुपयांच्या एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग मिळाले आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर सांगितले आहे. (ola electric received record rs 600 crore worth of bookings in one day for s1 e scooter)

तसेच, प्रति सेकंदात चार ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह, कंपनीने आतापर्यंत 86 हजार स्कूटरच्या विक्री ऑर्डरचा आकडा गाठला आहे, जो आतापर्यंत ऑटोमोबाईल उद्योगात ऐतिहासिक आहे. गुरुवारी बुकिंगचा शेवटचा दिवस आहे आणि मध्यरात्रीनंतर खरेदी बंद होईल, असे भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.

ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर एस 1 प्रोची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूममधील आहेत आणि राज्य अनुदानावर अवलंबून बदलू शकतात. ओला ए 1 ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज 120 किमी आहे, तर एस 1 प्रो ची रेंज 180 किमी आहे.  एस 1 प्रो ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ओला एस 1 मॉडेलमध्ये 2.98 केडब्ल्यूएच बॅटरी आहे, तर एस 1 प्रोमध्ये 3.97 केडब्ल्यूएच बॅटरी आहे.

(OLA देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, ई-स्‍कूटर प्‍लांट फक्त महिलाच चालविणार)

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते. डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिले आहे. तसेच वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाणार आहे.

(केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया)

ओलाने डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेलची निवड केली आहे आणि कोणतेही फिजिकल स्टोअर उघडले नाही. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून 499 रुपयांची बुकिंग रक्कम भरून स्कूटर बुक करू शकतात. ग्राहकांना 'आधी रिझर्व्ह करा, आधी मिळवा' या तत्त्वावर डिलिव्हरी मिळेल. कंपनीच्या मते, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल, तसेच कंपनी ग्राहकांना त्यांचे स्कूटर खरेदी करण्यासाठी लोन आणि ईएमआय सुविधाही देत ​​आहे, त्यासाठी अनेक कंपन्यांशी करार केला आहे.

(Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात)

ओला इलेक्ट्रिकने 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस 1 स्कूटर प्रति महिना 2,999 रुपयांच्या समान मासिक हप्त्यावर (ईएमआय) उपलब्ध होईल. तर, या इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 प्रोच्या अॅडव्हान्स व्हर्जनसाठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, बुकिंगची रक्कम किंवा कोणत्याही आगाऊ पेमेंट जोपर्यंत रिफंड केले जाऊ शकते, तोपर्यंत ते युनिट तामिळनाडूमधील कारखान्यातून ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवले जात नाही. 

टॅग्स :AutomobileवाहनOlaओलाbusinessव्यवसाय