शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

OLA Electric Scooter: ओला स्कूटरचा गौडबंगाल! किंमत दाखवतेय एक, घेतेय भलतीच

By हेमंत बावकर | Updated: September 15, 2021 15:53 IST

how much Ola Electric Scooter Final Price in Maharashtra, Pune: दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही आज त्यांच्या वेबसाईटवर दाखविली.

ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची (Ola's e-scooter) विक्री अखेर आजपासून सुरु झाली. ८ सप्टेंबरला तांत्रिक बिघाडामुळे विक्री होऊ शकली नव्हती. ओलाने आज ज्यांनी स्कूटर बुक केली होती त्यांना मेसेज पाठविले. ओलाने जेव्हा स्कूटर लाँच केली तेव्हा  कमी रेंजच्या मॉडेल एस 1ची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रूपये एवढी ठेवण्यात आली होती. मात्र, आज ग्राहकांना पाठविलेल्या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडीनंतरची किंमत ola s1 ची 75099 आणि Ola S1 Pro ची 100149 एवढी दाखविली होती. परंतू खरेदी करण्यासाठी गेल्यास त्यावर लाँचिंगवेळचीच किंमत आकारली जात असल्याने गोंधळ उडालेला आहे. ओलाला नेमकी त्यांच्या स्कूटरची किंमतच माहिती नसल्याचे यावरून दिसत आहे. (OLA Electric Scooter price difference when final payment booking. )

OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटर कशी बुक कराल; लोन, सुरुवातीला किती भरायचे आदी जाणून घ्या 

Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही आज त्यांच्या वेबसाईटवर दाखविली. परंतू खरेदी करताना ओला मूळ किंमतच आकारत आहे. तसेच महाराष्ट्रात फक्त 5000 रुपयेच सबसिडी मिळेल असे दाखवत आहे. 

Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात

ओलाच्या स्कूटरची नेमकी किंमत किती? (how much Ola Electric Scooter Final Price in Pune)पुण्यातील ग्राहकाने ओलाची स्कूटर (OLA Electric Scooter) बुक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला ओलाच्या एस १ प्रो स्कूटरची किंमत 1,63,549 रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. तर होम चार्जरसाठी 9000 रुपये आणि परफॉर्मन्स अपग्रेडसाठी 17000 रुपये अधिकचे दाखविण्यात येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ओलाने FAME-2 सबसिडी 59,550 एवढी दाखविलेली आहे. असे करून ओलाची स्कूटर ही 1,29,999 रुपयांना पडते. त्यातही 7706 रुपयांचा इन्शुरन्स आणि हेल्मेट 1299 रुपयांना माथी मारलेले आहे. 2138 रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स पकडून जर पुण्याच ही स्कूटर खरेदी करायची असेल तर 1,40,643 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. एस १ साठी 1,10,356 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्याच्या सबसिडीचे 5000 रुपये तुम्हाला तुमच्यापरीने क्लेम करावे लागणार आहे. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन