शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 11:06 IST

ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत.

कॅब सर्व्हिस देणारी ओला कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे इलेक्ट्रिक उत्पादन व्यवसायासाठी ओला भरती करत आहे तर दुसरीकडे जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ जुलैपासून कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. साधारण ४००-५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते असं सांगितले होते परंतु सूत्रांनुसार ही संख्या १ हजारांपर्यंत वाढू शकते. 

ही प्रक्रिया काही आठवडे सुरू राहील. कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्याठिकाणी ते कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. ज्यांची कामगिरी खराब राहिली आहे अशा कर्मचाऱ्यांना कंपनीने स्वच्छेने राजीनामा देण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना वर्षाच्या कामावरून दिले जाणारे अपरायझल देखील यंदा टाळले आहे. म्हणजेच जे कर्मचारी नोकरीवर ठेवायचे आहेत, त्यांना यंदा पगारवाढ मिळणार नाही. एवढेच नाही तर ओलाने युज्ड कार सेल सह अन्य कंपन्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत. गेल्याच महिन्यात कंपनीने युज्ड कारचा उद्योग बंद केला होता. महत्वाचे म्हणजे देशभरातील १०० शहरांत ३०० सेंटर खोलणार होती. याद्वारे १० हजार नोकऱ्या उपलब्ध करणार होती. याचबरोबर क्विक कॉमर्स बिझनेस Ola Dash देखील बंद करणार आहे. 2015 मध्ये Ola Cafes वर्षभरात बंद केले होते. यानंतर कंपनीने ओला फूड्स देखील सुरु केले होते, परंतू ते देखील म्हणावा तसा वेग पकडू शकला नाही.

कंपनीने १८ जुलै रोजी सांगितले की, ते बेंगळुरूमधील आगामी सेल बॅटरी सेल संशोधन आणि विकास सुविधेत सुमारे ५० कोटी डॉलर गुंतवणूक करत आहे, जे ऑगस्टमध्ये काम करण्यास सुरुवात करेल आणि ५०० ​​हून अधिक अभियंते आणि पीएचडी धारकांना रोजगार देईल. २१७० नावाचा भारतातील पहिला स्वदेशी विकसित लिथियम-आयन बॅटरी सेल विकसित केला आहे. त्यांनी बॅटरी तयार करण्यासाठी सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाशी १८ हजार कोटींचा करार केला आहे. 

टॅग्स :Olaओला