शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ना लायसन, ना आरटीओ रजिस्ट्रेशन; ओडिसी इलेक्ट्रीकच्या 'स्लो' इलेक्ट्रीक स्कूटर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 13:59 IST

Odysse Electric Scooter's launch: देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल

मुंबई  : सध्या जगात ई-मोबिलिटी साधनांची रेलचेल सुरू आहे. दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य देश म्हणून भारताचा उदय झाला. ओडिसी  इलेक्ट्रीक व्हेईकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाने धावणारी ई2गो स्कूटर लॉन्च केली आहे. 

लीड-अॅसिड आणि लिथियम आयन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर धावण्यासाठी स्वस्त पर्याय ठरणार आहेत. शिवाय त्यांच्याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची आवश्यकता नसते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत देखील इतर इलेक्ट्रीक स्कूटरच्या तुलनेत कमी असून ती युवा वर्ग आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरेल. ई2गो आणि ई2गो लाईटची अनुक्रमे किंमत रु 52,999 आणि रु 63,999 (एक्स-शोरूम, अहमदाबाद) याप्रमाणे आहे. या उत्पादनांची मॉडेल्स 5 रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत.    

ओडिसी  ई2गो’मध्ये 250 वॅट, 60व्ही बीएलडीसी (वॉटरप्रूफ) इलेक्ट्रीक मोटर बसविण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये 1.26 Kwh लिथियम-आयन बॅटरी किंवा 28 Ah लीड अॅसिड बॅटरी हे दोन बॅटरी पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांत अँटी-थेफ्ट मॅकेनिझमची सोय आहे. इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वोच्च वेग 25 kmph असून पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किमीचे अंतर पार करू शकते. चार्ज करण्य़ासाठी सुमारे 3.5 ते 4 तास लागतात. यामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क, ड्यूएल स्प्रिंग हायड्रॉलिक रिअर शॉक अॅबसॉर्बर देण्यात आले आहे. नवीन ओडिसी ई2गो इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रिवर्स गियर फंक्शन, 3 ड्राईव्ह मोड्स, एलईडी स्पीडोमीटर, अँटी-थेफ्ट मोटर लॉकिंग, कि-लेस एन्ट्री आणि युएसबी चार्जिंग दिलेले आहे. यामधील लिथियम बॅटरीज पोर्टेबल असून 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. या बॅटरीज ओडिसी विक्रेत्यांकडे देखील सहज उपलब्ध असतील. 

देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत 25 हून अधिक शहरांत ओडिसी उपलब्ध होईल. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड