शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:11 IST

October 2025 Auto Sales : सणासुदीच्या हंगामामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राला मिळालेला 'बुस्टर डोस' ऑक्टोबर २०२५ च्या विक्री अहवालातून स्पष्ट झाला आहे.

सणासुदीच्या उत्साहाने भरलेला ऑक्टोबर महिना देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी रेकॉर्डब्रेक ठरला आहे. जीएसटी कपातीमुळे वाहनांची विक्री एवढी वाढली, एवढी वाढली की लोकांनी दसरा, दिवाळीचा मुहूर्त गाठत सर्वच कंपन्यांना कधीही न पाहिलेले आकडे दाखविले आहेत. मारुतीच नाही तर टाटा, महिंद्रा, ह्युंदाईसह स्कोडानेही आजवर कधीही न पाहिलेला आकडा पार केला आहे. 

ऑक्टोबर महिन्याची वाहन विक्रीची आकडेवारी आली आहे. यानुसार मारुती १.९० लाख कार विकून एक नंबरवर आहे. टाटा मोटर्सने सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ विक्रीत महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) आणि ह्युंदाई यांच्यावर आघाडी कायम ठेवली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (टीएमपीव्ही) ने ७४,७०५ युनिट्सची विक्री नोंदवली. एम अँड एमच्या ६६,८०० युनिट्स आणि ह्युंदाईच्या ६५,०४५ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. 

किआ इंडियाची एकूण विक्री २९,५५६ युनिट्सवर, वार्षिक तुलनेत ३०% वाढ झाली आहे. टाटा मोटर्सची ईव्ही विक्री ७३% वाढून ९,२८६ युनिट्सवर पोहोचली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑक्टोबरमध्ये एकूण विक्रीत ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून ती गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ३०,८४५ युनिट्सच्या तुलनेत ४२,८९२ युनिट्सवर पोहोचली आहे. 

निसान मोटर इंडियाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५ टक्के मासिक विक्री वाढ नोंदवली. या ऑटोमेकरने महिन्यात एकूण ९,६७५ कार विकल्या. कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री २,४०२ युनिट्स होती आणि निर्यात एकूण ७,२७३ युनिट्स आहेत. एमजी मोटरने 5,753 एवढ्या कार विकल्या आहेत. होंडाने 7,168 कार विकल्या आहेत. बीवायडी ५६०, 

स्कोडाने गाठला आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा...स्कोडा ऑटो इंडियाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ८,२५२ युनिट्सची विक्री नोंदवली, जी त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.  स्कोडाच्या कायलॅक या छोट्या एसयुव्हीला मोठी मागणी नोंदविण्यात आली. तर कुशकनेही चांगली विक्री नोंदविली. २०२५ च्या पहिल्या १० महिन्यांत, स्कोडा ऑटो इंडियाने ६१,६०७ वाहने विकली आहेत. स्कोडा आणि फोक्सवॅगनची एकत्रित विक्री ही 12,054 एवढी आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनMarutiमारुतीTataटाटाHyundaiह्युंदाईMahindraमहिंद्राSkodaस्कोडाNissanनिस्सान