शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:17 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे सांगत होते. ही यंत्रणा आता प्रत्यक्षात येऊ लागली आहे. टोलच्या रस्त्यांवर जीएनएसएस ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे. ज्या गाड्यांमध्ये जीएनएसएस असेल त्यांचा टोल या पद्धतीने कापला जाणार आहे.

टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा मोठी रांग, १० सेकंड वेटिंगचा खरोखरच नियम होता? NHAI कडे लाखो तक्रारी...

यानुसार ज्या गाड्या या तंत्रज्ञानाने लेस असतील त्यांना टोल असलेले राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस वे वरून दररोज जरी २० किमी एवढाच प्रवास केला तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 

यासाठी २००८ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांनुसार टोल असलेल्या रस्त्यावरून २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे जीएनएसएस असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे. या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे. या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅगवाले वाहन घुसल्यास त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. 

ही यंत्रणा वापरण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस वाहनात असणार आहे. तसेच टोल रोडवर नंबर प्लेट वाचू शकणारे कॅमेरे असणार आहेत. यानुसार वाहनाने कापलेले अंतर ओळखून टोल घेतला जाणार आहे. यामुळे इंधन वाचणार असून टोलनाक्यावरील वेळही वाचणार आहे. ही प्रणाली सध्या कर्नाटकातील NH-275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभाग आणि हरियाणातील NH-709 च्या पानिपत-हिसार विभागावर बसविण्यात आली असून प्रायोगिक तत्वावरील अभ्यास पूर्ण झाल्यानंतर देशभरात बसविली जाणार आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण