शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:22 IST

केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ पद्धतीने ‘आरटीओ’च्या १२ सेवा दिल्या जात होत्या. आता आणखी दोन सेवांची भर पडली. त्यात घरी बसूनच वाहन हस्तांतरण (ट्रान्सफर) आणि तात्पुरती नोंदणीही करता येईल. केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

काय सुविधा? ‘लर्निंग लायसन्स’ परीक्षा, डुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, एनओसी, आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकॉर्डमध्ये मोबाइलचा नंबर नोंदविणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवेचा समावेश.

असा करा अर्ज वाहन विकणाऱ्यांनी व वाहन विकत घेणाऱ्यांनी ‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावरून वाहन हस्तांतरणाकरिता आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज करावा. वाहन व चेसीस क्रमांकाचे छायाचित्र ओळखपत्रासह अपलोड करावे. अर्ज पूर्ण केल्यानंतर नमुना २९ ची एक प्रत मूळ नोंदणी प्राधिकरणास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. अर्जदारास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. प्राप्त अर्ज छाननी करून दोन दिवसांच्या आत निकाली निघेल.

तात्पुरत्या नोंदणीसाठी हे कराn ‘फेसलेस’सेवेच्या मदतीने तात्पुरती नोंदणी ही सेवा परिवहन संवर्गातील वाहन वैयक्तिक नावावर नोंदणी करावयाचे असलेल्या अर्जदारांसाठी सुरू करण्यात येत आहे. n वाहन वितरकांनी ‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावरून वाहनाचे तात्पुरती नोंदणी अर्जाचे एन्ट्री व व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करा.n वाहन वितरकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.  अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘आरटीओ’ कार्यालय वाहन वितरकास माहिती देईल.

कर्ज नसलेल्या वाहनांचेच होणार हस्तांतरण ‘फेसलेस’मधील वाहन हस्तांतरण ही सेवा कर्जबोजा नसलेल्या वाहनांसाठी असणार आहे. याशिवाय, खासगी संवर्गातील वाहने व वैयक्तिक नावावर वाहन असलेल्या अर्जदारांकरिता राहणार आहे.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस