कार महाग होत आहेत, तरीही त्या घेण्यास लोक काही कंजुसी करत नाहीएत. पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. कंपन्यांनी एकसोएक फिचर्स देण्यास सुरुवात केली आहे. समोरच्या कंपनीने हे आणले तर दुसरी कंपनी ते आणतेय. रस्सीखेच सुरु आहे. परंतू, एक फिचर असे आहे ज्याने जागतिक स्तरावर कारची विक्री तब्बल ३ टक्क्यांनी वाढविली आहे आणि भविष्यातही या फिचरमुळे कारची मागणी वाढतच राहणार आहे.
नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....
एसी नाही, सनरुफ नाही, अडास तर नाहीच नाही. मग कुठले असे फिचर आहे जे लोकांना नवीन कार घेण्यासाठी आकर्षित करत आहे. ते आहे इन्फोटेनमेंट सिस्टीम. पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीमला मोठी मागणी आली आहे. ज्या कंपन्या साधे सॉफ्टवेअर असलेली इन्फोटेन्मेंट सिस्टीम देतायत त्यापेक्षा जास्त फिचर्स असलेल्या इन्फोटेन्मेंट सिस्टीमकडे लोक वळू लागले आहेत. २०२४ मध्ये या एका फिचरसाठी ३ टक्के विक्री वाढल्याचे दिसून आले आहे.
यामुळे येत्या काळात ऑटो टेक्नॉलॉजीमध्ये मोठा विकास होताना दिसणार आहे. कार ही प्रवासासाठी असते, परंतू तो आरामदायी करण्यासाठी आता ही सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी खूप फायद्याची ठरत आहे. याबाबतीत भारतीय कुठे आहेत ते माहिती नाही, कारण अजूनही कार कंपन्या इन्फोटेन्मेंट सिस्टीम नसलेल्या कारही मोठ्या प्रमाणावर विकत आहेत. साधा ब्लूटूथसाठीचा डिस्प्ले दिला जात आहे. तसेच हायफाय सॉफ्टवेअर असलेल्या एमजीच्या कारनाही मागणी होत नाहीय.
काउंटरपॉइंट रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ ते २०३५ दरम्यान इन्फोटेनमेंट सिस्टीम मार्केट ३% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) वाढण्याची अपेक्षा आहे. या काळात वार्षिक विक्री १०५ दशलक्ष युनिट्सपेक्षा जास्त असू शकते असा अंदाज आहे. ऑटो उद्योग आता सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेइकल्सकडे वेगाने वाटचाल करत आहे. पारंपारिक सिंगल-फंक्शन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECU) ऐवजी आता मल्टी-फंक्शन ECU आधारित इन्फोटेनमेंट सिस्टीमचा अवलंब केला जात आहे.