भारतीय बाजारात साडे सहा लाखांच्या एक्स शोरुम किंमतीत मस्क्युलर आणि बोल्ड दिसणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही निस्सान मॅग्नाईटने कमाल करून दाखविली आहे. भारतात तयार झालेल्या निस्सान मॅग्नाईटची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नाईटने फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविली आहे.
नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....
निस्सान मॅग्नाईटला एडल्ट ऑक्युपेंटसाठी ५ स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंटसाठी ३ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. यानुसार एकंदरीत निस्सान मॅग्नाईटने ५ स्टार रेटिंग मिळविली आहे. भारतात आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कारमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टाटाने सुरुवात करून दिली आणि नंतर आता अशक्य वाटणाऱ्या मारुतीनेही डिझायरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत कमाल केली आहे. या यादीत आता निस्सानची भर पडलेली आहे.
निस्सानने वन कार वन वर्ल्ड पॉलिसी सुरु केली असून भारतात बनणारी ही मॅग्नाईट कार ६५ देशांना निर्यात केली जाते. ६ एअरबॅग्ज, ६७ टक्के उच्च दर्जाच्या असलेल्या स्टीलपासून बनवलेली बॉडी स्ट्रक्चर, BS + EBD, ESC, TCS, HSA, ब्रेक असिस्ट, TPMS यांचा समावेश आहे.
निस्सानने नुकतीच मॅग्नाईटचे सीएनजी व्हर्जन लाँच केले आहे. सीएनजी किट कंपनी फिटेड नाही तर रेट्रो फिटेड असणार आहे. या कारची किंमत कंपनीने ₹६.८९ लाख रुपये ठेवली आहे. डीलर स्तरावर हे किट मिळणार आहे. भविष्यात निस्सान सात सीटर एमपीव्ही, छोटी कार आणणार आहे.