भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी निसान मोटर इंडियाने मुंबईत आपल्या सेवेचा मोठा विस्तार केला आहे. कंपनीने लक्ष्मी निसान डीलरशिप अंतर्गत काल मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांमध्ये म्हणजेच घाटकोपर आणि मालाडमध्ये दोन नवीन शोरूम उघडले आहेत. तर, कांदिवलीत नवीन सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे. निसान आता मुंबईत आपली पकड अधिक मजबूत करत असून, नवीन शोरूम्स आणि वर्कशॉपमुळे ग्राहकांचा वेळ आणि कष्ट वाचणार आहेत. दरम्यान, अधिक माहितीसाठी ग्राहक निसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
घाटकोपर आणि मालाडमध्ये शोरूम्समध्ये एकाच वेळी चार गाड्या प्रदर्शित करण्याची सोय आहे. तसेच, कांदिवलीत सुरू झालेल्या वर्कशॉपमुळे कारच्या दुरुस्तीचा प्रश्नही सुटला आहे. या वर्कशॉपमध्ये दरमहा ३०० गाड्यांची सर्व्हिसिंग करण्याची क्षमता आहे, असा दावा कंपनीने केला आहे. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात निसानच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. विशेषतः नवीन निसान ग्रॅव्हाइट आणि लोकप्रिय निसान मॅग्नाइट या गाड्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे."
Web Summary : Nissan Motor India expands in Mumbai with new showrooms in Ghatkopar and Malad, plus a service center in Kandivali. This strengthens Nissan's presence, improving customer convenience. The Kandivali workshop can service 300 cars monthly. Nissan aims to reach more customers in Maharashtra.
Web Summary : निसान मोटर इंडिया ने मुंबई में घाटकोपर और मलाड में नए शोरूम और कांदिवली में एक सर्विस सेंटर खोला है। इससे निसान की उपस्थिति मजबूत होगी और ग्राहकों को सुविधा मिलेगी। कांदिवली वर्कशॉप हर महीने 300 कारों की सर्विसिंग कर सकता है। निसान का लक्ष्य महाराष्ट्र में अधिक ग्राहकों तक पहुंचना है।