शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Nissan Datsun India Exit: फोर्डनंतर आणखी एक कंपनी भारत सोडून चालली; एक ब्रँडच केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:19 IST

निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली.

निस्सान मोटर्स इंडियाने भारतात आल्यापासून पाय रोवण्याचा प्रयत्न केला. यासाठी एका मागोमाग एक असे ब्रँडही आणले परंतू काहीच चालले नाही म्हणून अखेर गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. निस्सानने डॅटदस या ब्रँडच्या कारची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

चेन्नई येथील प्रकल्पात redi-Go (रेडी-गो) चे उत्पादन बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. डॅटसन हा ब्रँड जगभरात अखेरच्या घटका मोजत असून तो आता फार मोजक्या देशांमध्ये राहिला आहे. भारतात येताच निस्सानने डॅटसन ब्रँड आणला होता. या ब्रँडच्या  गो+, गो आणि रेडी गो अशा पाच ते सात सीटर कार रस्त्यावर उतरविल्या होत्या. सुरुवातीला काहींनी या ब्रँडमध्ये रस दाखविला. परंतू, नंतर अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली आणि कंपनी फसली. यानंतर ही कंपनी पुन्हा काही उभी राहू शकली नाही. 

निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली. परंतू डॅटसनला मात्र कोणतीच कार सापडली नाही. लोकांना स्वस्त आणि मस्त ऑफर देऊनही कंपनीना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॅटसनला गाशा गुंडाळावा लागला आहे. आता निसानच्या म्हणण्यानुसार रेडी गोची विक्री सुरु राहिल आणि डॅटसनच्या ग्राहकांना आधीसारखीचे सेवा दिली जाईल. 

निस्सानने सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीसाठी डॅटसन बंद केल्याचे सांगितले जात आहे. २०२० मध्ये ही कार लाँच केली होती. ही चालली नसती तर निस्सानला देखील काढता पाय घ्यावा लागला असता. परंतू या कारला मोठी पसंती मिळाली आणि निस्सानच्या भारतीय बाजारात आशा पल्लवीत झाल्या आहेत. आकर्षक लूक आणि कमी किंमत यामुळे ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली होती. परंतू पुन्हा या कारची विक्री मंदावल्याचे दिसत आहे. यामुळे निस्सानला या कारकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे. 

टॅग्स :Nissanनिस्सानDatsunडॅटसन