नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:14 PM2024-01-03T17:14:38+5:302024-01-03T17:14:57+5:30

सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे.

Nexon to go...! If you see 2024 Hyundai Creta Facelift's new look, interior, you will say 'bye' to Tata... | नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल...

नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल...

काही महिन्यांपूर्वी टाटाने नेक्सॉनला मोठी अपडेट दिली होती. बाहेरील लुकबरोबरच अंतर्गत देखील मोठे बदल केले होते. त्यात स्टेअरिंग, इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आदीमध्ये मोठी अपडेट होती. यामुळे सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे. येत्या १६ जानेवारीला सर्वांच्या पसंतीची क्रेटा नव्या रुपात आणणार आहे. 

क्रेटाचे बुकिंग सुरु झाले आहे. क्रेटाच्या या फेसलिफ्टचा बाहेरील लुक आणि आतील लुक यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याचे काही फोटो कंपनीने व्हायरल केले आहेत. Hyundai Creta मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. तसेच 10.25-इंच ड्युअल स्क्रीन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम नव्या युजर इंटरफेससह देण्य़ात येणार आहे. 

सेंटर कन्सोलचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. गियर लीव्हर रिडिझाईन करण्यात आला आहे. Hyundai Creta फेसलिफ्ट बॅकलिट स्विच, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील, सेंटर आर्मरेस्ट, केबिनसाठी ड्युअल-टोन थीम देण्यात येणार आहे. एसयूव्ही 3 इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. यात 1.5 लीटर MPI पेट्रोल, 1.5 लीटर U2 CRDI डिझेल आणि 1.5 लीटर Kappa Turbo GDI पेट्रोल इंजिन असेल.

2024 Hyundai Creta सात प्रकारांमध्ये ऑफर केली जाईल – E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O). 6 मोनो-टोन आणि 1 ड्युअल-टोन रंग पर्याय असतील. 

Web Title: Nexon to go...! If you see 2024 Hyundai Creta Facelift's new look, interior, you will say 'bye' to Tata...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.