शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:04 IST

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे.

नवी दिल्ली-

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे. कंपनीनं या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये बरेच नवे फिचर्स दिले आहेत. सर्वात लक्षवेधी बाब अशी की इलेक्ट्रिक सनरुफ (Maruti's First Car with Sunroof) असलेली ही पहिलीच कार ठरणार आहे. नव्या ब्रेझामध्ये काळ्या रंगाचं इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आलं आहे. 

मारुतीनं ब्रेझा कारमधून Vitara शब्द आता हटवला आहे. आता ही कार फक्त मारुती ब्रेझा नावानं ओळखली जाणार आहे. मारुतीनं २०१६ साली जेव्हा पहिल्यांदा ब्रेझा लॉन्च केली होती तेव्हा फक्त ही कार डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध होती. त्यानंतर कंपनीनं कारचं पेट्रोल व्हर्जन बाजारात आणळं होतं. नवी ब्रेझा पेट्रोल इंजिनमध्येही उपलब्ध करुन देण्यात आली आहे आणि यात मारुती Smart Hybrid टेक्नोलॉजीचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

पावरमध्ये दमदार आहे Brezza नव्या ब्रेझामध्ये 1.5 लीटर ड्युअल जेट के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन नुकतंच मारुतीनं Ertiga आणि XL6 मध्येही उपलब्ध करुन दिलं आहे. इंजिन 101bhp ची सर्वाधिक पावर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील मिळणार आहेत. 

Brezza मध्ये पहिल्यांदा 'हे' फिचर्सनव्या ब्रेझामध्ये अनेक नवे फिचर्स देण्यात येणार आहेत. जसं की इलेक्ट्रिक सनरुफ मारुतीच्या कारमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. तसंच अनेक फिचर्स हे नुकत्याच लॉन्च झालेल्या Baleno Facelift मधून घेण्यात आले आहेत. ब्रेझामध्ये ९ इंचाची फ्लोटिंग SmartPlay Pro+ इन्फोटेन्मेंट सिस्टम, हेडअप डिस्प्ले आणि ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा असे फिचर्स असणार आहेत. याशिवाय कारमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्लेचाही पर्याय देण्यात आला आहे.

कारमध्ये सराऊंडेड साऊंड सेन्स ऑडियो टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे. तसंच केबिनमध्ये तुम्हाला अॅम्बियन्स मूड लायटिंग, वायरलेस चार्जिंगसारखे फिचर्स देखील मिळणार आहेत. कारमधील इन्फोटेन्मेंट सिस्टम व्हाइस कंट्रोलवर काम करेल. एकूण ९ रंगात कार उपलब्ध होणार आहे. तर ही कार Lxi, VXi, ZXi आणि ZXi Plus अशा व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Brezza ची किंमत किती?नव्या मारुती ब्रेझाची किंमत सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा थोडी अधिक असणार आहे. या कारची किंमत ७.९९ लाखांपासून सुरू होत आहे. तर वेगवेगळ्या व्हेरिअंटसाठी वेगवेगळ्या किमती आहेत. तर टॉप व्हेरिअंटची किंमत १३.९६ लाख इतकी असणार आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन