शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Honda Activa Premium Edition मध्ये गोल्डन थीमचा तडका; सर्वातआधी इथं जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 11:34 IST

Honda कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून Activa च्या नवीन मॉडेलचे टिझर जारी केले जात आहेत. ज्यात नव्या Activa ची झलक पाहायला मिळत होती.

Honda कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून Activa च्या नवीन मॉडेलचे टिझर जारी केले जात आहेत. ज्यात नव्या Activa ची झलक पाहायला मिळत होती. पण अ‍ॅक्टिव्हाच्या नव्या मॉडेलवरून अखेर पडदा उठला आहे. नवीन Activa चं नाव Honda Activa Premium Edition असं आहे. नवीन अ‍ॅक्टिव्हा नवीन रंग आणि डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. इंजिनची वैशिष्ट्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहतील. नवीन अ‍ॅक्टिव्हाचे वेगवेगळे भाग सोनेरी रंगात दिसणार आहेत. कंपनीने Activa Premium Edition Deluxe मॉडेलच्या किमतीही आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत ७५,४०० रुपये आहे.

गोल्डन रंगाचा तडकाHonda Activa Premium Edition मध्ये सोनेरी रंगाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. या सोनेरी रंगात नव्या अ‍ॅक्टिव्हाची नवी ओळख बनण्याची क्षमता आहे. कारण सोनेरी रंग आगामी स्कूटरच्या अनेक भागांना वेगळा लूक देत आहे. नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या चाकांचा रंगही सोनेरी आहे. याशिवाय अ‍ॅक्टिव्हा प्रीमियमचा फ्रंट लूक आणि समोर होंडाचे नावही सोनेरी रंगाचे देण्यात आले आहे. लेटेस्ट स्कूटरची आतील बॉडी आणि सीट कव्हर देखील सोनेरी आहे. 

Activa प्रीमियमचे फीचर्सActiva चे नवीन मॉडेल अनेक नव्या फीचर्ससह सादर करण्यात आलं आहे. प्रीमियम आवृत्तीत इंधन भरण्यासाठी कॅप बाहेर उपलब्ध असेल. नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरमध्ये अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-सीट स्टोरेज, एलईडी हेडलॅम्प आणि ईएसपी तंत्रज्ञान यांसारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. अ‍ॅक्टिव्हा प्रीमियमच्या इंजिनला फ्युएल इंजेक्शन देण्यात आले आहे.

इंजिन आणि रंगाचे पर्यायActiva Premium Edition चे इंजिन सध्याच्या मॉडेलप्रमाणेच आहे. कंपनीनं इंजिनमध्ये कोणतेही मोठे अपग्रेड केलेले नाही. नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये 109.51 सीसीचे इंजिनही उपलब्ध आहे. Honda ने Activa चे नवीन मॉडेल तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केलं आहे. यामध्ये ग्राहकांना मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक, मॅट रेड मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू कलर पर्याय मिळतात.

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन