होंडा टू-व्हीलर इंडियाने अपडेटेड अॅक्टिव्हा -125 (Activa 125) लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 94,422 रुपयांपासून सुरू होते. DLX आणि H-Smart अशादोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अपडेटेड अॅक्टिव्हा -125 मध्ये अतिरिक्त फीचर्स आणि नवीन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.
नवीन होंडा अॅक्टिव्हा -125 मध्ये दिलेल्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने स्कूटरची एक उत्कृष्ट अॅक्टिव्हा डिझाइन आहे. दरम्यान, यात एक कंट्रास्टिंग ब्राउन सीट आहे आणि इनर पॅनल्ससाठी एकाच कलरची थीम आहे, ज्यामुळे तो थोडा प्रीमियम अनुभव येतो.
कंपनीने ही स्कूटर खरेदी करण्यासाठी सहा कलरचे ऑप्शन दिले आहेत, ज्यामध्ये पहिला कलर पर्ल इग्नियस ब्लॅक, दुसरा कलर मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक, तिसरा कलर पर्ल डीप ग्राउंड ग्रे, चौथा कलर पर्ल सायरन ब्लू, पाचवा कलर रेबेल रेड मेटॅलिक आणि सहावा कलर पर्ल प्रिशियस व्हाईट आहे.
याचबरोबर, प्रमुख बदल म्हणजे इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. अॅक्टिव्हा -125 ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 4.2-इंचाचा TFT डिस्प्ले मिळतो, ज्यामध्ये कॉल आणि मेसेजसाठी नेव्हिगेशन आणि अलर्ट यांसारख्या फंक्शन्स आहेत. नवीन अॅक्टिव्हा-125 मध्ये Type C चार्जिंग पोर्ट देखील आहे, ज्याद्वारे डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकते.
इंजिन स्पेसिफिकेशनअॅक्टिव्हाच्या भारतातील यशाचे रहस्य नेहमीच त्याचे इंजिन राहिले आहे. अपडेटेट व्हर्जनमध्ये 123.9cc सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. सीव्हीटी गिअरबॉक्सच्या मदतीने, हे इंजिन 8.3bhp आणि 10.5Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये आइडलिंग स्टार्ट-स्टॉप फीचर्स आहे आणि ते आता OBD2B कंप्लायंट देखील आहे.
मायलेजहोंडा अॅक्टिव्हा 125 च्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, शहरात 52.63 kmpl आणि हायवेवर 66.8 kmpl इतके मायलेज देते. तसेच, अॅक्टिव्हा 125 च्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, या सेगमेंटमध्ये अॅक्टिव्हा 125 ची थेट स्पर्धा Suzuki Access 125, TVS Jupiter 125 आणि Hero Destiny 125 सोबत होऊ शकते.