शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

केंद्र सरकारने काढली नवीन BH Series; दुसऱ्या राज्यातले पोलीस वाहनाला थांबवू शकणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 11:08 IST

Central govt introduces BH-series mark for personal vehicles, to ease transfer across states : भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानुसार जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला त्याचे वाहन 1 वर्षाच्या आत नव्या राज्यात पुन्हा रजिस्टर करावे लागते. हा त्रास वाचणार आहे.

Vehicle registration Transfer: नोकरी, धंद्यानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर ठराविक महिन्यांनंतर तुम्हाला तुमची जुनी कार किंवा बाईक त्या राज्य़ात रजिस्टर करावी लागते. त्यासाठी खर्च आणि परत जुन्या आरटीओची एनओसी वगैरे असे क्लिष्ट प्रकार असतात. यामुळे वाहनचालक तसे न करता जुन्या राज्यातील पासिंगचीच वाहने फिरवतात आणि पोलिसांनी पकडले की एकतर दंड भरतात किंवा वाहन जप्त केले जाते. या कटकटीपासून वाचण्यासाठी मोदी सरकारने नवीन उपाय योजला आहे. (Govt introduces new registration mark under BH-series for new vehicles)

भारत सरकारने वाहनांचा नवीन रजिस्ट्रेशन मार्क सुरु केला आहे. यानुसार भारत सीरीज (bharat series किंवा bh-series) च्या नावाने असलेल्या या रजिस्ट्रेशनद्वारे वाहनांचे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर सोप्या पद्धतीने केले जाणार आहे. MoRTH ने भारत सीरीजची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता नवीन वाहने बीएच सीरीज (bh-series) मध्ये रजिस्टर करता येणार आहे. ही सुविधा पर्यायी आहे. जर एखाद्या व्यक्ती एका पेक्षा जास्त राज्यांमध्ये नोकरी, कामानिमित्त जास्त काळासाठी जात असेल तर त्याच्यासाठी हे सोयीचे असणार आहे.

काय आहे नियम...भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानुसार जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला त्याचे वाहन 1 वर्षाच्या आत नव्या राज्यात पुन्हा रजिस्टर करावे लागते. नवीन सीरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरी देखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे. 26 ऑगस्टला हे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. Bharat series (BH-series)

कोणाला मिळणार ही सुविधा...डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या ज्यांची कार्यालये 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत. 

कसा असेल नंबर...जेव्हा वाहन मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट होतो, तेव्हा बीएच सीरीजच्या वाहनांची फेरनोंदणी करण्याची गरज नाही. या रजिस्ट्रेशनचा फॉर्मॅट YY BH 4144 XX असा आहे. YY पहिले रजिस्ट्रेशन वर्ष, BH- भारत सीरीज, कोड 4-0000 ते 9999, XX- मधली अक्षरे AA to ZZ.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसcarकारscooterस्कूटर, मोपेड