शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅश गार्ड हे चालकाच्या नव्हे तर इंजिनच्या संरक्षणासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 08:00 IST

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते.

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते. मात्र ते चालकाच्या पायाच्या संरक्षणाचा भाग नाही.मोटारसायकलींचे प्रमाण आज चांगलेच वाढले आहे. मोटारसायकलीला स्कूटरसारखी बाहेरून झाकणारी वा संरक्षण देणारी काही विशिष्ट रचना नसते.मात्र विविध प्रकारचे लोखंजी, स्टीलचे गार्ड्स या मोटारसायकलींसाठी बाजारात मिळतात. सर्वच प्रकारचे हे गार्डस वा रॉड हे प्रत्येक मोटारसायकलीला लावलेले असतात असे नाही. मात्र काही महत्त्वाचे गार्ड्स हे मोटारसायकलीसाठी आवश्यक असतात. मोटारसायकलीचे अपघातामध्ये वा अगदी स्टॅण्डवरून पडतानाही काही महत्त्वाच्या भागाचे संरक्षण व्हावे यासाठी अशा प्रकारचे संरक्षक गार्ड्स वा रॉडद्वारे तयार केलेली एक रचना गरजेची असते. त्यामधील एक म्हणजे फ्रंट क्रॅश गार्ड.हे गार्ड नेमके कशासाठी असते, असा प्रश्न अनेकांना पडतो, काहींना वाटते, पायाला त्यामुळे संरक्षण मिळते, अपघाताच्यावेळी पुढे क्रॅश गार्ड असल्याने काही आपटण्यापासून पायाला संरक्षण मिळते, असेही वाटते. मात्र शास्त्रीयदृष्ट्या तसे नाही. क्रॅशगार्ड हे अपघातामध्ये वा अतिमोठ्या खड्ड्यामध्ये मोटारसायकल आपटली गेली व त्यामुळे मोटारसाकलच्या पुढे असलेल्या इंजिन व संलग्न भागाला नुकसान होऊ नये, यासाठी लावण्याची पद्धत आहे. ते ही विशिष्ट आकाराचे असते. काहीवेळा स्टाइल म्हणून एक आडवा सिंगल बार लावला जातो, अशा प्रकारच्या सिंगल बारला क्रॅशगार्ड म्हणता येत नाही. अपघाताच्यावेळी चालकाच्या पायाला, गुडघ्याला, घोट्याला संरक्षण मिळावे, समतोल साधण्यासाठी त्यावर पाय ठेवता यावा, अशा संरक्षणात्मक कामासाठी हे प्रभावी साधन नव्हे हे पहिले लक्षात ठेवायला हवे. यामुळेच मोटारसायकल घेतल्यानंतर त्या मोटारसायकलीला कोणत्या पद्धतीचे क्रॅशगार्ड लावायचे, कोणत्या ाकाराचे लावायचे याचा पूर्ण विचार करूनच ते लावावे. फॅशन वा स्टाइल म्हणून नव्हे.साधारणपणे क्रॅशगार्डमुळे मोठ्या अपघाताच्यावेळी चालक फेकला गेल्यास क्रॅशगार्डमध्ये पाय अटकण्याचा संभव नसतो. मात्र फार वेग नसताना मोटारसायकल जमिनीवर घासत गेली तर किंवा अिधक वेग असतानाही ती एका बाजूला पडली व घासत गेली तर क्रॅशगार्डमुळे मोटारसायकलीच्या इंजिनाच्या भागाला धक्का कमी बसतो, कारण या गार्डमुळे जमिनीमध्ये व इंजिनामध्ये एक गॅप तयार होते. जमिनीपासून इंजिन काही अंतरावर राहाते. अर्थात त्यामुळे पाय अडकण्याचा संभव असू शकतो, त्यावेळी पायाला या गार्डपासून काही संरक्षम मिळत नाही उलट त्रास होतो. पाय अडकणे, घसरण थांबल्यानंतर बाहेर पडायला त्रास होणे अशा प्रकाराने अपघातापासून होणारी शारीरीक इजा होणारच. पायाचा गुडघा व अँकल, तसेच हाडाचा भाग यासाठी स्वतंत्र वेगळे गार्ड असते. अर्थात ते वापरण्याची भारतात पद्धतच नसते. इतके सामान कोण घेणार, ते ठेवणार कुठे हा प्रश्न असतो. हेलमेटही नाकारणारा भारतीय मानसिकतेचा भाग विचारात घेतला तर हे लक्षात येऊ शकेल. मात्र एक खरे की मोटारसायकलीला असणारे क्रॅशगार्ड प्रामुख्याने इंजिन व मोटारसायकलीचे काही भाग याचे बर्याच प्रमाणात संरक्षण करू शकते, अर्थात ते सारे अपघातात कोणत्या प्रकारे मोटारसायकल असते, त्यावरच अवलंबून आहे.