शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

World's Most Expensive Bike: 'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 20:24 IST

Neiman Marcus Limited Edition Fighter ही जगातील सर्वात महागडी बाईक आहे. पाहा काय आहे या बाईकमध्ये खास.

World's Most Expensive Bike Neiman Marcus Limited Edition Fighter : तुम्हाला माहितीये जगातील सर्वात महागडी बाईक कोणती आहे? ही बाईक खरेदी करणं प्रत्येकाचंच स्वप्न ठरेल असंही म्हणता येऊ शकतं. या बाईकचं नाव आहे नीमन मार्कस लिमिटेड एडिशन फायटर (Neiman Marcus Limited Edition Fighter). पाहूया काय खास आहे या बाईकमध्ये ज्यामुळे ही बाईक जगातील सर्वात महागडी बाईक ठरत आहे.

नाम नीमन मार्कस लिमिटेड एडिशन फायटरची किंमत 11 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये जवळपास 81.75 कोटी रूपये (81,75,38,150) इतकी आहे. या बाईकचा लिलाव 110,000 डॉलर्सपासून सुरू झाला होता. परंतु अखेरीस ही बाईक 100 पट अधिक किंमतीत म्हणजेच 11 मिलियन डॉलर्सला विकली गेली. कंपनीनं या बाईकचे केवळ 45 मॉडेल्स तयार केले आहेत. यासाठीच या बाईकचं नावही लिमिटेड एडिशन असं ठेवण्यात आलंय.

कंपनीनं तयार केली युनिक बाईकनीमन मार्कस कंपनी ही कोणतीही ऑटोमोबाईल कंपनी नाही, तर लक्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रान्ड आहे. परंतु या कंपनीनं मोटरसायकल जेव्हा लिलावासाठी लाँच केली तेव्हा याची इतकी बोली लागली की ही जगातील सर्वात महागडी बाईक ठरली. दरम्यान, ही बाईक जशी दिसते त्यापेक्षाही ही अधिक उत्तम असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

काय आहे खास?ही बाईक अवघ्या काही सेकंदात 300 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच या बाईकची बॉडी टायटॅनियम, अॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबरनं तयार केली आहे. याशिवाय या बाईकचा लूकही उत्तम आहे. या बाईकला 'इव्होल्यूशन ऑफ द मशीन' असं म्हटलं गेलं होतं. यात 120ci 45-डिग्री एअर-कूल्ड V-Twin इंजिन देण्यात आलं आहे. यामुळे ही बाईक अधिक शक्तिशाली बनते.

टॅग्स :bikeबाईक