नवी दिल्ली : Toyota India ने आपली पावरफुल फुलसाईज एसयुव्ही Toyota Fortuner चा नवा अवतार भारतात लाँच झाला आहे. नवीन 2021 Toyota Fortuner Facelift आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 29.98 लाख रुपये आहे.
याचबरोबर टोयोटाने फॉर्च्यूनरचा आणखी एक व्हेरिअंट Toyota Legender लाँच केला. या एसयुव्हीची किंमत 37.58 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 2.8 लीटरचे टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 204bhp ची ताकद आणि 500Nm चा टॉर्क प्रदान करते. या आधीच्या एसयुव्हीचे इंजिन 177 bhp ची ताकद आणि 450 Nm टॉर्क प्रदान करत होते. नवीन फॉर्च्यूनरला जास्त ताकद प्रदान करण्यात आली आहे. 2021 Toyota Fortuner Facelift ला 2.7 लीटर पेट्रोल इंजिनसोबतही लाँच करण्यात आले आहे. जे 166bhp ताकद देते. ही एसयुव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहे. आजपर्यंत १.७ लाख फॉर्च्यूनर विकल्या गेल्या आहेत.
Fortuner Legenderभारतीय ग्राहकांची पसंत पाहून टोयोटाने आणखी स्पोर्टी आणि स्टायलीश व प्रिमिअम वाटणारी Fortuner Legender लाँच केली आहे. यामध्ये कम्फर्टकडे विशेष लक्ष देण्यात आहे. वायरलेस चार्जिंगसह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.