शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

MG मोटर भारतात करणार 3000 कोटींची गुंतवणूक; लवकरच येणार नव्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:40 IST

दिग्गज वाहन कंपनी असलेली मॉरिस गॅरेज (MG) भारतात जवळपास 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

नवी दिल्लीः दिग्गज वाहन कंपनी असलेली मॉरिस गॅरेज (MG) भारतात जवळपास 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. मूळ ब्रिटनची असलेल्या कंपनीचं सर्वाधिकार आता चीनच्या एसएआयसीजवळ आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतात कंपनीनं 2 हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. कंपनीचा हलोल (गुजरात)मध्ये कारखाना सुरू करण्यात आला आहे.  एमजी मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही भारताच्या बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहोत. जानेवारीत आम्ही भारतातल्या प्रवासाला सुरुवात केली. देशासाठी आमची योजना दीर्घकालीन आहे. आम्ही 3 हजार कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करणार आहोत. कंपनीनं आतापर्यंत भारतात जवळपास 13000 एमजी हेक्टर गाड्यांची विक्री केली आहे. एमजी मोटार इंडियानं नोव्हेंबर महिन्यात हेक्टरच्या 3239 गाड्यांच्या विक्री केल्या आहेत. कंपनी लवकरच एक इलेक्ट्रिक स्पोर्ट्स युटिलिटी गाडीही सादर करणार आहे. जुलै 2021पर्यंत आमच्याजवळ चार मॉडल असतील. सर्वच वाहनं एसयूव्ही प्रकारातील असणार आहे. एमजी मोटर स्वतःची इलेक्ट्रिक SUV ZS पुढच्या वर्षी जानेवारीत लाँच करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक SUVची किंमत 22-25 लाख रुपयांच्या आसपास राहणार आहे. एमजी मोटरची इलेक्ट्रिक एसयूव्ही ZSमध्ये 44.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 340 किलोमीटर अंतर कापणार आहे. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक कारची विक्री दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादेत करणार आहे. कंपनी सुरुवातीला दर महिन्याला इलेक्ट्रिक एसयूव्हीचे 100 युनिट्स तयार करणार आहे. मागणीच्या आधारावर याचं महिन्याकाठीचं उत्पादन वाढवून 200-300 युनिट करण्यात येणार आहे. सध्या एमजी मोटर इंडिया हेक्टर एसयूव्हीच्या 6-सीटर आवृत्तीवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या कारचं मॉडल एमजी मोटारच्या कारखान्यात पाहायला मिळालं होतं. 6-सीटर एमजी हेक्टरची किंमत 5-सीटर आवृत्तीपेक्षा एक लाख रुपयांनी जास्त राहणार आहे.  

टॅग्स :carकार