शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

MG नं लॉन्च केली नवी ढासू 7-सीटर SUV, हिच्या सामोर टाटा सफारी, फॉर्च्यूनरही फेल; जबरदस्त आहे सेफ्टी अन् फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:47 IST

ही आता अपडेटेड एक्सटेरिअर आणि जबरदस्त केबीनसह येते.

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) सोमवारी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म व्हेरिअंट बाजारात लॉन्च केले आहे. हिची किंमत ₹40.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही आता अपडेटेड एक्सटेरिअर आणि जबरदस्त केबीनसह येते. खरे तर, हिच्यात फारसे कॉस्मॅटिक बदल करण्यात आलेले नाहीत. एमजी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्ममध्ये (MG Gloster BLACKSTORM) मेटल ब्लॅक आणि मेटल ऐश कलरने हायलाइट करण्यात येणारे 'ग्लोस्टर' आणि 'इंटरनेट इनसाइड' साइनसह स्पोर्टी एलिमेंट्स आणि बॉडीवर्कवर रेड शेड्स बघायला मिळतात.

ब्लॅक-थीमचे इंटीरिअर -एसयूव्हीच्या डार्क थीमला रूफ रेल, स्मोक्ड ब्लॅक टेललाइट, विंडो सराउंड, फेंडर आणि फॉग गार्निशने आणि अधिक सुंदर बनवण्यात आली आहे. SUV च्या केबीनमध्ये स्टिअरिंग व्हील, हेडलॅम्प्स, कॉलिपर्स तसेच फ्रंट आणि रिअर बम्परवर रेड एक्सेंटसह ब्लॅक-थीमचे इंटीरिअर देण्यात आले आहे. डार्क कलरची थीम असलेली लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, लाल टांक्यांनी शिवलेली आहे. यामुळे संपूर्ण इंटीरिअरला एक स्पोर्टी टच येतो.

लेवल 1 ADAS सेफ्टी फीचर्स -ग्लोस्टर एसयूव्हीला 2wd आणि 4wd दोन्हीतही सादर केल्या जात आहेत. यात 7 ड्राइव्ह मोड्स बघायला मिळतात. जे हिला वेगवेगळ्या भागांत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेग घेण्यास मदत करतात. ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म 2.0-लिटर डिझेल इंजिनपासून पॉवर घेते. सेफ्टी हायलाइट्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, आता ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्मला 30 हायलाइट्स मिळतात. यात लेव्हल 1 अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिमचाही (ADAS) समावेश आहे.

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सcarकारAutomobileवाहन