Maruti GST Price Cut: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुजुकीने आज आपल्या सर्व कार्सच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. WagonR पासून Alto आणि Ignis सारख्या छोट्या कारदेखील जवळपास 1.29 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहेत. ही कपात येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की, जीएसटी सुधारांचा (GST Reforms) थेट फायदा ग्राहकांना मिळावा, यासाटी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या कारच्या किमतीत किती कपात?
मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग अँड सेल्स) पार्थो बनर्जी यांनी सांगितले की, ही कपात फक्त जीएसटी सुधारणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. मात्र, गाड्यांच्या फीचर्स किंवा तंत्रज्ञानात कोणताही बदल केलेला नाही. कमी किमतीत सर्व फीचर्स दिले जातील.
दरम्यान, या नवीन प्राइस अपडेटनंतर ऑल्टो K10 ही कंपनीची सर्वात स्वस्त कार राहिलेली नाही. आता कंपनीच्या पोर्टफोलिओत Maruti S-Presso ही सर्वात स्वस्त कार झाली आहे. या कारच्या किमतीत सर्वाधिक ₹1,29,600 ची कपात करण्यात आली आहे.
पाहा सर्व गाड्यांच्या नवीन किमती
मॉडेल | कपात (एक्स-शोरुम) | नवीन किंमत(₹) |
---|---|---|
S-Presso | Up to 1,29,600 | 3,49,900 |
Alto K10 | Up to 1,07,600 | 3,69,900 |
Celerio | Up to 94,100 | 4,69,900 |
Wagon-R | Up to 79,600 | 4,98,900 |
Ignis | Up to 71,300 | 5,35,100 |
Swift | Up to 84,600 | 5,78,900 |
Baleno | Up to 86,100 | 5,98,900 |
Tour S | Up to 67,200 | 6,23,800 |
Dzire | Up to 87,700 | 6,25,600 |
Fronx | Up to 1,12,600 | 6,84,900 |
Brezza | Up to 1,12,700 | 8,25,900 |
Grand Vitara | Up to 1,07,000 | 10,76,500 |
Jimny | Up to 51,900 | 12,31,500 |
Ertiga | Up to 46,400 | 8,80,000 |
XL6 | Up to 52,000 | 11,52,300 |
Invicto | Up to 61,700 | 24,97,400 |
Eeco | Up to 68,000 | 5,18,100 |
Super Carry | Up to 52,100 | 5,06,100 |