शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता ना Thar टिकणार, ना Innova! दिवाळी पूर्वीच मारुती करणार मोठा धमाका; येतायत 3 नव्या कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 20:24 IST

आता मारुती सुझुकी पुढील 3 ते 4 महिन्यांत दोन नवे मॉडेल्स लान्च करत आपला SUV पोर्टफोलिओ आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे.

मारुतीच्या नव्या ब्रेझा (Brezza) आणि ग्रँड विटाराला (Grand Vitara) ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे कंपनी खूश आहे. यानंतर आता मारुती सुझुकी पुढील 3 ते 4 महिन्यांत दोन नवे मॉडेल्स लान्च करत आपला SUV पोर्टफोलिओ आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. याच बरोबर, कंपनी ब्रँडचे सर्वात महाग युटिलिटी वाहन 2023 च्या दिवाळीपूर्वीच लॉन्च करू शकते. ही एक 7 सीटर कार असेल.

Maruti Suzuki Fronx -ही कार 100bhp, 1.0L 3-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 89bhp, 1.2L डुअल-जेट NA पेट्रोल या दोन इंजिन पर्यांत उपलब्ध होईल. याच बरोबर, 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि AMT हे ट्रान्समिशन पर्यायही यात उपलब्ध असतील. हिचे इंटिरिअर बलेनो आणि नव्या ब्रेझा सारखे असू शकते. नवी मारुती फ्रोंक्स क्रॉसओव्हर सुझुकीच्या HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यावरच बलेनो हॅचबॅकही तयार झाली आहे.

Maruti Suzuki Jimny -ही एसयूव्ही 1.5-लिटर K15B 4-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह आणली जाईल. हिचे इंजिन 103bhp आणि 134Nm आऊटपुट देईल. ट्रान्समिशन पर्यांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट सामील असतील. या कारमध्ये सुझुकीचे AllGrip Pro 4×4 ड्राइव्हट्रेन मिळेल. ही कार दोन ट्रिम्स जीटा आणि अल्फा मध्ये येईल. ही एसयुव्ही बाजारात महिंद्रा थारला टक्कर देईल.

Maruti Suzuki 7-Seater MPV -माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकी ऑगस्ट 2023 पर्यंत भारतीय बाजारात टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर बेस्ड 7 सीटर एमपीव्ही सादर करू शकते. जे ब्रँडचे सर्वात महागडे मॉडेल असेल. ही नेक्सा डिलरशिप नेटव्हर्कच्या माध्यमाने विकली जाईल. या कारमध्ये ADAS तंत्रज्ञानही असेल. ही बाजारात इनोव्हा हायक्रॉसला टक्कर देईल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार