शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Maruti WagonR आणि Alto K10 सेफ्टीमध्ये निघाल्या फुस्स, मिळाले 1-2 स्टार! असा आला क्रॅश टेस्ट रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:32 IST

ग्लोबल NCAP ने गेल्या 9 वर्षात मारुती सुझुकी इंडियाच्या 14 मॉडेल्सची टेस्टिंग केली आहे. यांपैकी केवळ मारुती ब्रेझालाच समाधानकारक 4 स्टार रेटिंग मिळाली आहे.

मारुती सुझुकीच्या कारची त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नेहमीच खिल्ली उडवली जाते. आता कंपनीच्या मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) आणि मारुती सुझुकी अल्टो के 10 (Maruti Suzuki Alto K10) या लोकप्रिय कारनेही सुरक्षिततेच्या बाबतीत निराश केले आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या दोनही कार फुस्स ठरल्या आहेत. ग्लोबल NCAP ने गेल्या 9 वर्षात मारुती सुझुकी इंडियाच्या 14 मॉडेल्सची टेस्टिंग केली आहे. यांपैकी केवळ मारुती ब्रेझालाच समाधानकारक 4 स्टार रेटिंग मिळाली आहे.

मारुती सुझुकी वॅगनआरला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार, तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 0 स्कोर आला आहे. तर मारुती सुझुकी ऑल्टो K10 ला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन साठी 2 स्टार, तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 0 स्कोर मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, ऑल्टो के-10 आणि वॅगनआर हे देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहेत. 

मारुती सुझुकी ऑल्टो K10 ने समोरील धडकेत वयस्क प्रवाशाच्या छाती पासून ते डोक्यापर्यंत ठीक-ठाक प्रोटेक्शन दिले. मात्र साइडने टक्कर झाल्यानंतर, हिने कमकुवत सुरक्षा दर्शवली आहे. याच पद्धतीने वॅगनआरनेही ड्रायव्हरच्या छातीसाठी कमकुवत सुरक्षिततात दर्शवली आहे.

Maruti Wagonr चे सेफ्टी फीचर्स -मारुती वॅगनआरची किंमत 5.53 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारला डुअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर आणि हिल-होल्ड असिस्ट (केवळ एएमटी मॉडेलवर) सारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले जातात.

Maruti Alto K10 चे सेफ्टी फीचर्स -मारुती वॅगनआरची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारला डुअल एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग सारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले जातात.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहनcarकार