मारुती कंपनीने नव्या जीएसटी कपातीच्या तोंडावर मोठा धमाका केला आहे. आजच मारुतीच्या व्हिक्टोरिस या एसयुव्ही कारला ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यानंतर लगेचच मारुतीने व्हिक्टोरिस नव्या जीएसटी दरासह लाँच केली आहे.
Maruti Victoris च्या बेस व्हेरिअंटची किंमत 10,49,900 रुपये (एक्स-शोरूम) पासूवन सुरु होत आहे. या कारची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. म्हणजेच ही किंमत जीएसटी कापूनच देण्यात आलेली आहे.
Maruti Victoris मध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड असे प्रकार देण्यात आले आहेत. जवळपास २१ व्हेरिअंटमध्ये ही कार असणार आहे. या कारच्या टॉप एंड स्ट्राँग हायब्रिड मॉडेलची किंमत 19,98,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर सीएनजी व्हेरिअंट 11,49,900 रुपयांपासून मिळणार आहे.
या कारचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार सीएनजी असली तरी बूट स्पेस मोठीच मिळणार आहे. कारण या कारमध्ये अमेरिकेसारख्या देशात बऱ्याच वर्षांपासून असलेल्या अंडरबॉडी सीएनजी टँकची सिस्टीम देण्यात आली आहे.
मायलेज...या ५-सीटर एसयूव्हीचा मॅन्युअल प्रकार २१.१८ किमी/लिटर, ऑटोमॅटिक प्रकार २१.०६ किमी/लिटर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह प्रकार १९.०७ किमी/लिटर मायलेज देतो. त्याचा सीएनजी प्रकार २७.०२ किमी/किग्रॅ मायलेज देतो.