शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 12:31 PM

Nissan Magnite Price: भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे.

नवी दिल्ली : निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत. Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. 

भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत.  ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे.

वेलकम अॅनिमेशनसह ७ इंची टीएफटी मीटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फुल फ्लश टचस्क्रीनसह ८ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन आदी देण्यात आले आहे. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. एचआरएओ १.०-लीटर टर्बो इंजिन देणअयात आले आहे. मॅन्युअल ५ स्पीड आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

सुरक्षेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट (एचबीए), वेहिकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (टीसीएस), हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए), स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, सेंट्रल लॉकिंग, एसआरएस ड्युअल एअरबॅग सिस्टिम विथ प्रेझेंटेशन व लोडलिमिटर सीटबेल्ट आदी प्रणाली देण्यात आल्या आहेत. ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही मारुतीच्या ब्रेझा, फोर्डच्या इकोस्पोर्ट, टोयोटाच्या अर्बन क्रूझर, ह्युंदाईच्या व्हेन्यू, कियाच्या सोनेट आणि टाटाच्या नेक्सॉनला टक्कर देणार आहे. 

किंमत...

 

टॅग्स :Nissanनिस्सानMarutiमारुतीTataटाटा