शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Swift: मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 14:55 IST

Maruti Swift Sale in 16 years: मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत.

मारुतीच्या सर्वात स्वस्त हॅचबॅकने विक्रीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. 25 लाख युनिट विकले गेले असून ही कार 2005 मध्ये लाँच झाली होती. या 16 वर्षांत या कारचे रुपडेच पालटले असून ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. 

Maruti Suzuki: मारुतीचा ग्राहकांना झटका; Swift सह CNG कारच्या किंमती वाढविल्या, जाणून घ्या...मारुती सुझुकीची स्विफ्ट कार आपल्या अॅडव्हान्स स्टायलिंग, पावरट्रेन आणि आरामदायी ड्रायव्हिंगमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. स्विफ्टची किंमत 5.84 लाख रुपये ते  8.52 लाख रुपये आहे. या कारचे सीएनजी व्हेरिअंटही येणार आहे. सध्या या कारची 9 व्हेरिअंट उपलब्ध आहेत. आता ही कार फक्त पेट्रोलमध्येच उपलब्ध असून 1.2 लीटर ड्युअलजेट इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनाला स्टार्ट-स्टॉप फंक्शन देण्यात आले आहे. यामुळे कार थांबविल्यास एका ठराविक काळासाठी इंजिन बंद होते आणि इंधन वाचते. ही कार मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 23.20kmpl चे ARAI मायलेज आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 23.7kmpl चे मायलेज देते. 

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचतमारुती सुझुकीचे भारतातील कार्यकारी संचालक (विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, स्विफ्ट 2020-2021 मध्ये भारतातील सर्वाधिक खपाची कार होती. तिन्ही पिढ्यांनी ICOTY पुरस्कार जिंकला आहे. स्विफ्ट घेणारे 52% हून अधिक ग्राहक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यामुळे या कारला तरुण पीढीची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसते.

OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीकमारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. यापैकी काही कार सीएनजीमध्ये आहेत. आता आणखी दोन कारची त्यामध्ये भर पडणार आहे. 

Maruti Suzuki Swift CNG मध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire CNG) देखील सीएनजीमध्ये लाँच केली जाणार आहे. दोन्ही कार टेस्टिंगवेळी दिसल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजीमध्ये लाँच झाल्यावर मारुतीकडे एकूण 8 सीएनजी कार असणार आहेत. एक अर्टिगा सोडली तर अन्य गाड्या या 30 ते 32 किमी प्रति किलोचे मायलेज देतात. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती