शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

New WagonR: मारुती WagonR चा नवा CNG अवतार लवकरच लाँच, मायलेज जाणून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:39 IST

ग्राहक ही कार विकत न घेता 12,000 रुपये प्रति महिन्या प्रमाणे भाड्यानेही घरी आणू शकतात. आता कंपनी लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणणार आहे.

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने प्रदीर्घ प्रतीक्षा करवल्यानंतर अखेर 2022 वॅगनआर भारतात लाँच केली आहे आणि फेसलिफ्ट मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलसाठी ही किंमत 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या कारचे सीएनजी व्हेरिअंटदेखील लाँच केले आहे, या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.81 लाख रुपये आहे. 

ही किफायतशीर कार केवळ खरेदी करूनच घरी नेता येते, असे नाही तर, ही कार आपण भाड्यानेही घेऊ शकता. कंपनीने नवी WagonR Facelift सबस्क्रिप्शनवरही उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक ही कार विकत न घेता 12,000 रुपये प्रति महिन्या प्रमाणे भाड्यानेही घरी आणू शकतात. आता कंपनी लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणणार आहे.

पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांत उपलब्ध -वॅगनआर 2022 ही पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यांपैकी पहिले इंजिन 1.0-लीटरचे सीरीज डुअल-जेट इंजिन आहे. हे इंजिन 65.7 बीएचपी पर्यंतची दमदार ताकद आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तर हिचे CNG व्हेरिअंट इंजिन 56 बीएचपी ताकद आणि 82 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दुसऱ्या क्रमांकावर येते 1.2-लीटर डुअल व्हीव्हीटी इंजिन, हे 88.5 बीएचपी ताकद आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 

कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स - या कारमध्ये अनेक प्रकारचे अॅडव्हाँस्ड फीचरही देण्यात आले आहेत. यात स्मार्टफोन नेव्हिगेशनसह 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. याला 4 स्पिकर्स आहेत. याशिवाय, या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि रिअर पार्किंग सेन्सर्ससह अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

जबरदस्त मायलेजचा दावा -कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारचे 1.0L इंजिन पेट्रोल व्हर्जनमध्ये 25.19 किमी/प्रति लीटर एवढे मायलेज देईल, जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे सुमारे 16 टक्के अधिक आहे. तर, S-CNG मध्ये हे मायलेज 34.05 kmpl असेल, सध्याच्या मॉडेलपेक्षा हे 5 टक्के अधिक आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन