शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी कोरी Maruti Brezza लॉंचसाठी सज्ज! फक्त ५ हजारात बुकिंग; पाहा, भन्नाट फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:15 IST

मारुतीची नवीन ब्रेझा २०२२ लॉंचसाठी सज्ज झाली असून, कोणते नवे फिचर्स मिळू शकतील? पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: भारतात वाहन निर्मितीत आघाडीवर असलेली स्वदेशी कंपनी म्हणजे Maruti Suzuki. या कंपनीच्या अनेकविध कार प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. यातच आता मारुती सुझुकीची New Vitara Brezza 2022 ही कार लॉंचसाठी सज्ज झाली आहे. जून महिन्याच्या शेवटी म्हणजेच २९ किंवा ३० तारखेला या कारला लॉंच केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, काही डिलर्सकडे ५ हजार रुपयांच्या टोकन रकमेवर ग्राहकांनी कार बुकिंग सुरू केले असून, अनेक डिलरशिपकडे नवीन कार पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

नवीन विटारा ब्रेझाच्या डिझाईनमध्येही बदल पाहायला मिळतील. नवीन ग्रिल, बंपर आणि हेडलाइट डिझाइन व्यतिरिक्त, याला हुडवर नवीन क्लॅमशेल स्टाइलिंग आणि नवीन फ्रंट फेंडर्स मिळतील. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागील दरवाजामध्ये बदल पाहण्यात आले आहेत. नवीन ब्रेझाला नवीन रॅपराउंड टेललाइट्स आणि पुन्हा डिझाइन केलेले बंपर मिळतात. नवीन जनरेशन ब्रेझा पेट्रोल प्रकारात आणण्याव्यतिरिक्त, मारुती सुझुकी लवकरच त्याचे CNG व्हेरिएंटही सादर करणार आहे. म्हणजेच ज्या ग्राहकाला या एसयुव्ही (SUV) मधून जास्त मायलेज हवे असेल, त्याला त्याचा पर्याय मिळेल.

सनरूफ आणि ३६०-डिग्री कॅमेरासह अनेक अत्याधुनिक फिचर्स

ब्रेझा २०२२ च्या इंटिरिअरलाही एक फ्रेश लुक देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नवीन ब्रेझा सनरूफ आणि ३६०-डिग्री कॅमेरासह येईल. काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी एसयूव्हीच्या टॉप-एंड प्रकारांमध्ये कनेक्टेड कार टेक, वायरलेस चार्जिंग सिस्टम, पॅडल शिफ्टर्स यांसारखी फीचर्स देऊ शकते. यासोबतच स्मार्टफोन सपोर्टसह सर्व-नवीन फ्री स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी युनिट आणि सर्व-नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इंटीरियरमध्ये दिले जातील. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ८ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी