शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki Swift S-CNG: मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार लाँच; जबराट मायलेज, किंमत... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 10:45 IST

स्विफ्ट एस-सीएनजी ही मारुतीची नववी सीएनजी कार आहे. स्विफ्ट व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, डिझायर, एर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि एस-सीएनजी तंत्रज्ञानासह टूर-एस मिळते.

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने भारतीय बाजारात लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचे सीएनजी (Swift CNG) मॉडेल आणले आहे. नुकतीच ही कार लाँच करण्यात आली. स्विफ्टची दोन व्हेरिअंट VXi आणि ZXi मध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. जाणून घ्या किंमत...

स्विफ्टच्या सीएनजी मॉडेल  Swift VXi S-CNG  ची किंमत 7.77 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर ZXi ची किंमत 8.45 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. Swift S-CNG मध्ये 1.2-लीटर, 4-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 89 PS ची ताकद आणि 4,400 rpm वर 113 Nm पीक टॉर्क तयार करते. सीएनजीवर सुरु असेल तेव्हा 77 PS ताकद आणि 98 Nm टॉर्क दिला जातो. 

मायलेज...मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार मायलेजमध्ये देखील चांगली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कार 30.90 किमी प्रति किलोग्राम मायलेज देते. स्विफ्ट एस-सीएनजी ही मारुतीची नववी सीएनजी कार आहे. स्विफ्ट व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, डिझायर, एर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि एस-सीएनजी तंत्रज्ञानासह टूर-एस मिळते.

मारुती सुझुकीची S-CNG वाहने ड्युअल इंटरडिपेंडंट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUs) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमसह येतात. ECU आणि इंजेक्शन प्रणालीचे काम पुरेसे हवा आणि इंधन मिश्रण पुरवठा करणे हे आहे. गंज टाळण्यासाठी, मारुती सुझुकी स्टेनलेस स्टील पाईप्स वापरत आहे. तसेच शॉर्ट सर्किटची शक्यता दूर करण्यासाठी वायरिंग हार्नेस टेक्निक वापरले आहे. याव्यतिरिक्त, एक मायक्रोस्विच देण्यात आला आहे, जो सीएनजी भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान इंजिनला सुरू होऊ देत नाही. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती