मारुती सुझुकीने ग्राहकांना गुड न्यूज देत, आपल्या पॉप्युलर मायक्रो-एसयूव्ही एस-प्रेसोची (S-Presso) किंमत कमी केली आहे. खरेतर, सरकारने नुकतेच, जीएसटी रिफॉर्म्स 2.0 अंतर्गत छोट्या पेट्रोल आणि CNG इंजिन असलेल्या वाहनांवरील टॅक्स कमी केला आहे. याचा फायदा थेट ग्राहकांना मिळत आहे. या निर्णयानंतर, S-Presso चे बेस मॉडेल 37000 रुपयांपर्यत तर टॉप-एंड CNG व्हेरिअंटवर 53,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तर जाणून घेऊयात, व्हेरिअंट निहाय एस प्रेसोच्या कमी झालेल्या किंमतीसंदर्भात.
जाणून घ्या, व्हेरिअंट निहाय कपातीसंदर्भात - मारुती सुझुकी एस-प्रेसोचे बेस मॉडेल STD (O) MT वर 37,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. अर्थात आता हिची किंमत कमी होऊन 3.90 लाख रुपयांवर आली आहे. तसेच, LXI (O) MT वर 43,000 रुपये आणि VXI (O) MT वर 44,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. याशिवाय, VXI+ (O) MT देखील आता 47,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सीएनजीवर सर्वाधिक फायदा -महत्वाचे म्हणजे, ऑटोमॅटिक व्हेरिअंट खरेदी करणाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. एस-प्रेसो VXI (O) AT वर 49,000 रुपये तर VXI+ (O) AT वर 52,000 रुपयांपर्यंत बचत होत आहे. तसेच, एस-प्रेसो LXI (O) CNG आता 51,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर टॉप-एंड VXI (O) CNG वरची किंमत 53,000 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. अर्थात आता S-Presso पूर्वीच्या तुलनेत अधिक बजेट-फ्रेंडली झाली आहे.
सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असलेली एस-प्रेसो जवळपास 32-34 km/kg पर्यंत मायलेज देते. भारतीय बाजारात एस-प्रेसोची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपयांपर्यं जाते.