शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:49 IST

Maruti Escudo थेट Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या पॉप्युलर SUVs ना टक्कर देऊ शकते....

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आज (3 सप्टेंबर) ला आपली नवी SUV Maruti Escudo लॉन्च करत आहे. मारुतीची ही SUV ब्रेझाच्या तुलनेत मोठी आणि ग्रँड व्हिटाराच्या तुलनेत स्वस्त असेल.  ही कार कंपनी आपल्या Arena डीलरशिप नेटवर्कच्या माध्यमाने विकेल. या कारच्या डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Escudo अत्यंत मॉडर्न आणि स्टायलिश आहे. हिच्यासोबत बूमरँग-स्टाइल 3D LED टेललँप, शार्क फिन अँटीना, इंटीग्रेटेड स्पॉइलर आणि मोठा टेलगेट देण्यात आला आहे. साइजच्या तुलनेत ही Brezza पेक्षा थोडी मोठी आणि साधारणपणे Grand Vitara एवढीच असेल. यामुळे या कारमध्ये अधिक केबिन स्पेस आणि बूट कॅपेसिटी मिळेल.

असं असेल इंजिन आणि पॉवरट्रेन? -Maruti Escudo मध्ये Grand Vitara प्रमाणेच इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहे. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन माइल्ड हाइब्रिड टेक्नॉलॉजीसह येईल. याशिवाय टोयोटाचे 1.5 लिटर TNGA स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनही दिले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, कंपनी या कारचे सीएनजी व्हर्जनही लॉन्च करण्याच्याव विचारात आहे. यामुळे ग्राहकांना पेट्रोल, हायब्रिड आणि CNG – तीनही पर्याय मिळतील.

इंटीरियर आणि टेक फीचर्स -एस्कुडोचे इंटीरियर अ‍ॅडव्हान्स्ड आणि प्रीमियम ठेवण्यात आले आहे. यात ९ इंचाचे मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल, जे वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट ही करेल. याशिवाय या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टीपल ड्राइव्ह मोड्स सारखी वैशिष्ट्येही असू शकतात. तसेच, फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री सारखी वैशिष्ट्यांचाही या कारमध्ये समावेश असणे अपेक्षित आहे.

या कारसोबत असेल स्पर्धा -Maruti Escudo थेट Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या पॉप्युलर SUVs ना टक्कर देऊ शकते. हिच्या किंमतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, अंदाजे हिची सुरुवातीची किंमत साधारणपणे 10 लाख रुपयांपासून सुरू होईल. अर्थात ही Grand Vitara च्या तुलनेत किफायतशीर असेल. तसेच, Brezza च्या तुलनेत अधिक फीचर-लोडेड असेल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहन