शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

40kmpl चं मायलेज देतील मारुतीच्या या 2 नव्या कार, 8 लाख पेक्षाही कमी असेल किंमत! फायद्याची ठरेल डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:34 IST

या दोन्ही कार 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केल्या जाऊ शकतात...

जर आपण चांगले मायलेज देणारी कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज आम्ही आपल्याला अशा कारसंदर्भात माहिती देत आहोत, ज्या 1 लिटर फ्युअलमध्ये तब्बल 35 ते 40 किलोमीटरपर्यंत मायलेज देतील. आम्ही बोलत आहोत मारुती सुझुकीच्या नव्या पिढीतील मारुती स्विफ्ट आणि डिझायरसंदर्भात. या दोन्ही कार 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केल्या जाऊ शकतात. मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायरचे हायब्रिड व्हर्जन लॉन्च करू शकते.

इंजिनमध्ये होणार बदल -मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पिढीच्या मारुती स्विफ्टला नवे  हायब्रीड इंजिन देण्यात येणार आहे. यात ग्राहकांना नवे 1.2 लिटर हायब्रीड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. Z12E K12C असा या इंजिनचा कोड असेल. हे इंजिन मारुतीच्या अपकमिंग अॅडव्हान्स ट्रिम्ससाठी रिझर्व ठेवण्यात आले होते. साधारणपणे जून-जुलै 2024 पर्यंत या गाड्या नव्या इंजिनसह भारतीय रस्त्यावर धावताना दिसू शकतात. 

काय असेल किंमत? -आताच्या ट्रिम्सचा विचार करता, या कारच्या किंमती फार अधिक नसतील असा अंदाज आहे. कारण मारुती आधीच टोयोटाकडून हायब्रीड तंत्रज्ञान घेत आहे. अर्थात या कारना हायब्रिड बनवण्यासाठी फारसा अधिक खर्च येणार नाही. अशा स्थितीत, या कारची संभाव्य किंमत 7.5 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होऊ शकते.

डिझाईनमध्ये होऊ शकतो बदल - सध्याच्या मारुती डिझायरला आणि मारुती स्विफ्टला उत्कृष्ट मायलेज आणि किफायतशीर किमतींमुळे भारतीय बाजारात प्रचंड मागणी आहे. आता या नव्या कार लॉन्च झाल्यानंतर, या गाड्यांची विक्री आणखी वाढू शकते. कंपनी आपल्या या हायब्रिड व्हेरिअंट कारच्या डिझाईनमध्ये स्पोर्टी एलिमेंटचा वापर करू शकते. यांच्या डिझाईनमध्येही काही प्रमाणावर बदल केला जाऊ शकतो.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकार