शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Hyundai, Tata ला धोबीपछाड! Maruti ची ‘ही’ कार नंबर १; किंमत कमी, फिचर्स दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:09 IST

मारुतीच्या या सेडान कारच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९९ टक्के वाढ झाली आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: आताच्या घडीला Maruti Suzuki कंपनीचे भारतीय बाजारात निर्विवाद वर्चस्व आहे आणि ते कंपनीने टिकवूनही ठेवले आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारी काढून पाहिल्यास मारुती सुझुकी कंपनी प्रत्येक महिन्याला जेवढी विक्री करते, त्याच्या आसपासही कुणी नसल्याचे दिसून येऊ शकेल. यातच मे महिन्यातील विक्रीचे आकडे समोर आले असून, मारुतीच्या सेडान कारने या सेगमेंटमध्ये अन्य स्पर्धक कंपन्यांना धोबीपछाड देत, क्रमांक एक कायम ठेवला आहे. 

Maruti Suzuki Dzire सेडान ही मे 2022 महिन्यात तिच्या सेगमेंटमधली भारतात सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे. मारुतीने गेल्या महिन्यात डिझायरच्या एकूण ११ हजार ६०३ युनिट्सची विक्री केली आहे. २०२१ मध्ये याच महिन्यात कंपनीने डिझायरच्या ५,८१९ युनिट्सची विक्री केली होती. डिझायरच्या विक्रीत यंदा ९९ टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या डिझायरच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६.२४ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ९.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवीन डिझायर सीएनजी पर्यायातही उपलब्ध असून, अनेकविध दमदार फिचर्स यात देण्यात आलेले आहेत.

टाटा ठरली क्रमांक २ ची कंपनी

गेल्या काही वर्षांपासून भारतात एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्सची विक्री वाढली आहे. दुसऱ्या बाजूला सेडान कार्सची विक्री मात्र काही प्रमाणात घटली आहे. असे असले तरी डिझायरसह टाटा मोटर्सच्या टाटा टिगॉर या कारने बाजारात चांगली कामगिरी केली आहे. विक्रीच्या बाबतीत आणि सेडानच्या यादीत टाटा टिगॉर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे २०२२ मध्ये कंपनीने टिगॉरच्या ३,९७५ युनिट्सची विक्री केली आहे. २०२१ मध्ये याच महिन्यात कंपनीने टिगॉरच्या ३६७ युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने यंदा टिगॉरच्या विक्रीत ९८३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

दरम्यान, या यादीत होंडा अमेझ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने मे २०२२ मध्ये या कारच्या ३७०९ युनिट्सची विक्री केली आहे गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने अमेझच्या ४७८ युनिट्सची विक्री केली होती. होंडाने अमेझच्या विक्रीत ६७६ टक्के वाढ नोंदवली आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी