शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

मारुती सुझुकी ब्रेझाला मॉडिफाय करून केली रेंज रोव्हर, पाहा जबरदस्त Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 09:10 IST

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं.

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं. कंपनीनं या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये बरेच नवे फिचर्स दिले आहेत. अवघ्या काही महिन्यांमध्ये ही कार ग्राहकांच्या पसंतीसही उतरली आहे. बाहेरचं डिझाईन हे कारचं मुख्य वैशिष्ट्य आहे.

नुकतेच मारुती ब्रेझाचं मॉडिफाईड व्हर्जन समोर आलं आहे. यामध्ये तब्बल 2 लाखांपेक्षाही अधिक किंमतीच्या ॲक्सेसरीजचा वापर करण्यात आलाय. या ॲक्सेसरीजसोबत ही का कर लँड रोव्हर एसयूव्हीची आठवणही करून देते. मॉडिफाईड कारमध्ये आता फ्रन्ट बम्परच्या खालील भागात एक कस्टम व्हाईट पेंज जॉबशिवाय रोव्हर कार्सप्रमाणे एक नवीन फ्रन्ट ग्रिल देण्यात आलेय.

या कारमध्ये हेडलाईट्सच्या खालील भागात एक्सटेंडेड डीआरएल, एलईडी फॉग लँप आणि हुडवर रेंज रोव्हर बॅज देण्यात आलाय. याचप्रकारे कारमध्ये ड्युअल टोन व्हाईट ब्लॅक कलर स्कीमही दिसून येते. यामुळे कार अतिशय मनमोहकही दिसते. कारमध्ये 18 इंचाचे मल्टिस्पोक मशीन कट अलॉय व्हिल्सही देण्यात आलेत, हे 245/45/R18 च्या टायर्स साईजसह येतात.

आणखी काय खास?मॉडिफाईड ब्रेझामध्ये ओआरवीएमच्या खाली सिल्व्हर स्टिकरशिवाय कस्टम फेंडर ट्रिम एलिमेंट्सही देण्यात आलेत. तर बॉडी क्लॅडिंगलाही पांढऱ्या रंगानं पेंट करण्यात आलंय. मागील बाजूलाही कस्टम ब्लॅक रेंज रोव्हर लोगो आणि नवे ड्युअल टिप एक्झॉस्ट सेटअप देण्यात आलेय.

इंटिरिअरमध्ये रेट्रोफिटेड सीट कव्हर, स्टिअरिंग रँप आणि डॅशबोर्ड रँप सोसबत ड्युअल टोन ब्राऊन ब्लॅक थीम मिळते. यामध्ये अँबिअंट लाईट, इल्युमिनिटेड डोअर सिल्ससोबत डोअर पॅड्स, प्रीमिअम 7 डी मॅट्स आणि आर्म रेस्टवर लेटर रँपही मिळतो. याशिवाय कारमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही.

पावरमध्ये दमदार आहे Brezza नव्या ब्रेझामध्ये 1.5 लीटर ड्युअल जेट के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन नुकतंच मारुतीनं Ertiga आणि XL6 मध्येही उपलब्ध करुन दिलं आहे. इंजिन 101bhp ची सर्वाधिक पावर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील मिळणार आहेत. मारुती सुझुकी ब्रेझाच्या मॅन्युअल बेस व्हेरिअंटची किंमत 7.99 लाख रुपये एक्स शोरुम आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीLand Roverलँड रोव्हर