शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

TATA, Maruti Car Launch: घाई महागात पडेल! पुढील महिन्यात या चार कार लाँच होणार; दोन खिशाला परवडणाऱ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 16:41 IST

Upcomming Cars in Next month: कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे.

भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ आहे. जगातील प्रख्यात ब्रँड भारतात व्यवसाय करतात. काही अमेरिकी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घ्यावा लागला असला तरीदेखील ज्या कंपन्या आहेत त्या आपले पाय मजबूतीने रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सतत त्यांची मॉडेल अपडेट करत असतात. यामुळे ग्राहकांसमोर कार निवडण्याचा पेच निर्माण होत आहे. 

कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे. पुढील महिन्यात मारुती सुझुकी Maruti Celerio, Tata Tiago CNG लाँच होणार आहेत. 

मारुतीने सेलेरियो कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. येत्या 10 नोव्हेंबरला ही कार लाँच केली आहे. याच दिवशी या कारची किंमतही सांगितली जाईल. नवीन सेलेरियो ही आधीपेक्षा मोठी आणि अपमार्केट असेल. 

टाटाने टियागो सीएनजी कारचे बुकिंग सुरु केले आहे. ही कार देखील नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच केली जाईल. लाँचवेळीच त्याची किंमत जाहीर केली जाईल. CNG व्हेरिअंट पेट्रोल कारपेक्षा 50 चे 60 हजार रुपयांनी महाग असेल. 

ऑडी क्यू५ऑडीने क्यू५ फेसलिफ्ट भारतात लाँच करण्याचे ठरविले असून प्री-बुकिंग सुरु केले आहे. या कारची 2 लाख रुपये देऊन बुकिंग केली जाऊ शकते. ही कार पाच रंगांत उपलब्ध होणार आहे. 

फोक्सवॅगन टिग्वानही कार लाँच करण्यासाठी तुम्हाला पुढील महिन्याची वाट पहावी लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये ही कार कंपनी बाजारात आणेल. या कारच्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक बदल पहायला मिळतील.

टॅग्स :TataटाटाMarutiमारुतीAudiआॅडीVolkswagonफोक्सवॅगन