शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Celerio CNG Price, Mileage: बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:04 IST

Maruti Celerio CNG launched उद्या टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. त्याआधीच मारुतीने सीएनजी कार लाँच केली आहे.

देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. एका किलोला ३५.६० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियो ही मारुतीची सहावी सीएनी कार आहे. 

भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० किलोची टाकी देण्यात आली आहे. 

उद्या टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. दरम्यान, फोटोमध्ये कारचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच असल्याचे दिसते. हे कारचे खालचे वेरिएंट आहे, ज्याला 15-इंच अलॉय व्हील आणि i-CNG बॅज देण्यात आला आहे.  टाटा टियागो आणि टाटा टिगोरचे सीएनएक्स मॉडेल्स आता अधिक किमतीचे असणार आहेत. या दोन्ही कारचे बुकिंगही अनधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे आणि शहर आणि डीलरशीपनुसार 5,000 आणि 11,000 रुपयांमध्ये दोन्ही सीएनजी मॉडेल्सची बुकिंग करता येईल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी