शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तुमच्या स्वतःच्या कारच्या नोंदी नीट ठेवा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 18:00 IST

आपल्या मालकीची कार ही केवळ मालमत्ता नाही, ती जबाबदारीही आहे. तिचे तपशील, विविध आवश्यक नोंदी या तुम्ही नेहमी जरूर नोंद करा व अद्ययावत राहा

ठळक मुद्देकारच्या प्रत्यक्ष शारीरीक जबाबदारीप्रमाणेच कारच्या कुंडलीची नोंदही एक जबाबदारी असतेसर्व्हिस सेंटर जसे चालवले जाते तसे तुमच्या कारबाबतही तुम्ही तशा नोंदी ठेवणे अतिशय गरजेचे असतेएखादा भाग कधी बदलला, ऑइल चेंज, वायपर ब्लेड बदल, इंधन भरणं आदी विविध माहिती लिहून ठेवा

काल मालकीची असली म्हणजे ती मालमत्ता नव्हे तर एक जबाबदारी असते. कार म्हणजे मालमत्ता आहे, तिला रिसेल किंमत आहे, असे काही जण समजत असले तरी ते पूर्ण बरोबर नाही. अॅन्टिक कार असले तरीही ती मालमत्ता नसते, तर जबाबदारीच असते. मग ती जबाबदारी तुमच्या कारच्या बाबतीत प्रत्यक्ष दुरुस्ती देखभालीची असो की, कारच्या कागदपत्रांची असो की, कारच्या देखभाल, विमा आदी तपशीलांची असो. कारची ही जबाबदारी प्रत्येक कार मालकाने नीटपणे पार पाडायलाच हवी. त्याचा कधी व कसा वापर करावा लागेल, हे काही सांगता येत नाही. यासाठीच कार ही केवळ मालमत्ता आहे, प्रेस्टिजचे एक साधन आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे इतकेच समजू नये.

कारच्या प्रत्यक्ष शारीरीक जबाबदारीप्रमाणेच कारच्या कुंडलीची नोंदही एक जबाबदारी असते. एखाद्या कार उत्पादकाचे सर्व्हिस सेंटर जसे चालवले जाते तसे तुमच्या कारबाबतही तुम्ही तशा नोंदी ठेवणे अतिशय गरजेचे असते. कार असो वा तुमचे दुचाकी वाहनही असो. आज नव्या काळामध्ये मोबाइलसारखे अतिशय चांगले साधन तुम्ही वापरत असता. त्यामध्ये असलेल्या कॅमेऱ्यापासून, नोट, डायरी, कॅलेंडर या प्रकारच्या साध्या साध्या अॅपचाही वापर तुम्ही करीत असता. मात्र तुमच्या स्वतःच्या कारसाठी वा वाहनासाठी तो वापर अनेकजण करीत नाहीत. खरे म्हणजे हार्डकॉपी तयार करून ही सारी नोंद कराच पण त्याचबरोबर लॅपटॉप, पी.सी., मोबाईलसारख्या साधनांचा वापर करूनही ही माहिती तुम्ही त्यात साठवू शकता, अद्ययावत ठेवू शकता. नव्हे तशी ठेवण्याची नक्कीच गरज आहे. कारसंबंधात माहिती नोंदवताना तुम्ही तीन भाग पाडा. त्यातमध्ये कारच्या उत्पादकाची,कार विकत घेतल्याची, कारमध्ये अतिरिक्त महत्त्वाची साधने लावली असतील त्याची तसेच तुमच्या मालकीसंबंधातील नोंदीची माहिती व कारचे छायाचित्र आदी माहिती जरूर नोंद करा. विमा, वॉरंटी, अतिरिक्त वॉरंटी, बॅटरीची वॉरंटी, बिल वा संबंधित कागद, वाहन चालनाचा परवाना वा संलग्न बाबींची कागदपत्रे यांची माहिती टेक्स्टद्वारे वा छायाचित्राद्वारे नोंद करू शकता. मोबाईल, पीसी, लॅपटॉपवर ते सारे साठवता येते.

दुसऱ्या भागामध्ये तुमच्या कारच्या देखभालीचे म्हणजे सर्व्हिसचे तपशील तुम्ही नोंद करू शकता. यासाठी वरील इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करू शकालच. खास करून मोबाईलमध्ये वा जीमेलचा वापर करत असाल तर कॅलेंडर, कीप, डॉक्युमेंट, छायाचित्र या अॅपचा वापर करू शकाल. तुमच्या कारची वा वाहनाच्या सर्व्हिसिंगचे तपशील, एखादा भाग कधी बदलला, ऑइल चेंज, वायपर ब्लेड बदल आदी विविध माहिती त्यामध्ये टाकू शकाल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे वेळ लागेल.

तिसऱ्या भागामध्ये तुम्ही तुमच्या कारमध्ये एक छोटीशी डायरी ठेवून त्यात इंधन भरण्याची तारीख, त्यानुसार तुमच्या गाडीचे रनिंग किती झाले त्यानुसार असलेली मीटरची नोंद, कुठे व कधी तुम्ही जाता त्याची नोंद करू शकता. मोबाईलमध्येही ही नोंद करू शकता.यामुळेही तुम्हा स्वतःच्या माहितीसाठीही उपयोग होईल व कारचे मायलेज किती मिळते, तुम्ही जात असलेल्या विविध ठिकाणांचे अंतर किती व कसे आहे याची नोंदही तुम्हाला आपोआप मिळणार आहे. या तीन प्रकारच्या नोंदींबरोबरच घरामध्येही एकत्रितपणे तुम्ही या नोंदी ठेवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचा थोडासा वेळ द्यावा लागेल.

 

टॅग्स :Automobileवाहनcarकार