शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 20:43 IST

Mahindra XUV 3XO : मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे.

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) नवीन एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओची (SUV Mahindra XUV 3XO) बुकिंग सुरू करून फक्त एक दिवस उलटला आहे. यादरम्यान एसयूव्हीने शानदार रेकॉर्ड कायम केला आहे. या कारला तासाभरात 50 हजार बुकिंग मिळाले आहेत. अवघ्या 10 मिनिटांत 27 हजार लोकांनी बुकिंग केले आहे. या मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे.

महिंद्रा XUV 3XO एसयूव्ही एकूण 9 व्हेरिएंटमध्ये आणि 3 इंजिन ऑप्शनमध्ये येते. भारतीय बाजारपेठेत ही कार सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील Hyundai Venue, Tata Nexon, Kia Sonet आणि इतर कारशी स्पर्धा करते. या कारची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 15.49 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

Mahindra XUV 3XO ची खासियतमहिंद्राची नवीन एसयूव्हीच्या काही गोष्टी इलेक्ट्रिक XUV400 शी मिळत्या जुळत्या आहेत. यात 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, 7-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, ॲड्रेनॉक्स कनेक्ट इन-कार कनेक्टिव्हिटी पॅक, मागील बाजूला टाइप-सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जर यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच, कारला पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे, जे 940 मिमी लांब आणि 870 मिमी रुंद आहे. पॅनोरामिक सनरूफसह सेगमेंटमधील ही पहिली एसयूव्ही आहे.

Mahindra XUV 3XO चे सेफ्टी फीचर्सया कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग, मागील बाजूस डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ISOFIX अँकर देण्यात आले आहेत. याशिवाय, हिल स्टार्ट, हिल डिसेंट असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, ADAS लेव्हल 2 टेक्नॉलॉजी आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये कारमध्ये टॉप-एंड व्हेरियंटमध्ये देण्यात आली आहेत.

Mahindra XUV 3XO चे इंजिनही SUV तीन इंजिन ऑप्शनसह येते. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 111bhp पॉवर जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. दुसरे म्हणजे 1.2 लीटर डायरेक्ट टर्बो पेट्रोल इंजिन, जे 131bhp पॉवर जनरेट करते. सोबत 6-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे. तिसरे म्हणजे 1.5 लिटर डिझेल इंजिन. यात फक्त 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहन