शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Mahindra Thar Electric: १५ ऑगस्टला समोर येणार महिंद्रा थार इलेक्ट्रिक, पाहा काय असेल खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 17:18 IST

महिंद्रा अँड महिंद्रानं अचानक थार इलेक्ट्रिकबद्दल माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रानं अचानक थार इलेक्ट्रिकबद्दल माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीने खुलासा केलाय की, 15 ऑगस्ट रोजी कंपनी थार एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचा (THAR.e) डेब्यू करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये ही कार सर्वांसमोर येईल.

तर टीझरमध्ये त्याचा लूक फ्युचरिस्टिक दिसून येतोय आणि ती एक कॉन्सेप्ट कार असू शकते. त्यामुळे बाजारात येण्यास बराच वेळ लागू शकतो. महिंद्रा त्यांच्या ऑफ-रोड सेगमेंटमध्ये काय बदल करतेय हे पाहावं लागणार आहे. महिंद्रा थारचा रेट्रो लूक हे त्याच्या लोकप्रियतेचंसर्वात मोठे कारण आहे. याशिवाय थार इलेक्ट्रिक किती यशस्वी ठरते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

कंपनीच्या ताफ्यात सध्या एक्सयूव्ही 400 ही इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. कंपनी BE.05 आणि BE.07 सारख्या नवीन वाहनांवर काम करत आहे. थार इलेक्ट्रिक पूर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स (फोर व्हील ड्राइव्ह) पाहायला मिळू शकेल.

महिंद्र थार सध्या 2.2L mHawk डिझेल इंजिनसह येते. हे इंजिन 128 hp ची मॅक्स पॉवर देते. तर दुसरी 2.0 लिटर Mstallian टर्बो पेट्रोल मोटर 150 hp ची पॉवर देते. याशिवाय, आणखी 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे जे 117hp ची पॉवर देते, जे RWD सेटअपसह येते. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर