शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 00:09 IST

अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते...

 

नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असून आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahinddra) ही भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि तिची इलेक्ट्रिक शाखा महिंद्रा ऑटोमोटिव्हने पुण्यात चालू असलेल्या अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह 2022 (Alternate Fuel Conclave 2022) मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची नवीन रेंज सादर केली आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर व्हेरिअंट आणि ई-अल्फा मिनी टिपरसह अ‍ॅटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे. इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

महिंद्रा अ‍ॅटम क्वाड्रिसायकल -इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी महिंद्रा अ‍ॅटम क्लीन एनर्जी, आरामदायी आणि स्मार्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. Atom सोबत, महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपरही बाजारात आणले आहे. ते ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ई-अल्फा मिनी टिपरला 1.5 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याच्या सिंगल चार्जवर 80 किमी पर्यंतची रेंज मिळते. याची लोडिंग क्षमता 310 किलो एवढी आहे. सध्या महिंद्रा अ‍ॅटमला व्यावसायिक वाहन म्हणून लाँच करण्यात आले आहे, ते वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

फक्त 3 लाख असेल किंमत!महिंद्रा अ‍ॅटम केवळ लुक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीतच पैसा वसूल कार नाही, तर तिची किंमतही खूपच कमी असण्याचा  अंदाज वर्तवला जात आहे. आतापासून असा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, परंतु या कारची किंमत सुमारे 3 लाख रुपयांच्या असापास असण्याचा अंदाज आहे. महिंद्रा अ‍ॅटमचा कमाल वेग ताशी 50 किमी एवढा असेल. तिला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते. इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणूनही समोर येऊ शकतो.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर