महिंद्रा कंपनीने देखील जीएसटी कपात केली आहे. महिंद्राने बोलेरो निओपासून ते एक्सयुव्ही ७०० पर्यंतच्या गाड्यांवरील जीएसटीमध्ये कपात केली आहे. ही कपात १ लाखापासून ते १.५६ लाखापर्यंत आहे. यामुळे महिंद्राच्या गाड्या खूपच स्वस्त होणार आहेत. ज्या लोकांना डिझेल गाडी घ्यायची आहे, त्यांना ही एक मोठी संधी असणार आहे.
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
महिंद्राच्या कारमध्ये सर्वाधिक जीएसटी कपात ही XUV 3XO वर झालेली आहे. एक्सयुव्ही थ्रीएक्सओच्या पेट्रोलवर १.४० लाखापर्यंत, तर डिझेल कारवर १.५६ लाखापर्यंतचा जीएसटी कमी झाला आहे. बोलेरो निओवर १.२७ लाख जीएसटी कमी झाला आहे. थार या गाडीवर १.३५ लाख आणि थार रॉक्सवर १.३३ लाख रुपयांचा जीएसटी कमी झाला आहे.
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
स्कॉर्पिओ क्लासिकवर १.०१ लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर स्कॉर्पिओ एनवर १.४५ लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. महिंद्राच्या ताफ्यात असलेल्या सर्वात मोठ्या एसयुव्हीवर XUV700 वर १.४३ लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता राज्या राज्यात एक्स शोरुम किंमत कमी-जास्त असल्याने त्या प्रमाणे महाराष्ट्रातील शहरांत किंमतीत फरक दिसणार आहे.