शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:06 IST

London Taxi In India : लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे.

ठळक मुद्देलंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे.

लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे. या Next Gen मॉडेलला LEVC TX या नावानं देखील ओळखलं जातं. TX चं उत्पादन करणारी कंपनी लंडन इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनीनं (LEVC) एक्सक्लुसिव्ह मोटर्ससोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी भारतात काही लक्झरी ब्रँड्सच्या वितरणाचं काम करते. LEVC चं स्वामित्व चिनी कार उत्पादक कंपनी Geely कडे आहे. ही कंपनी कोवेंट्री, युके येथे कार्यरत आहे.

LEVC नुसार, नवीन TX लंडन कॅब ही पहिल्यांदा 2017 मध्ये सादर करण्यात आली होती. कॅब अॅल्युमिनियम बाँडिंग तंत्रज्ञान वापरून तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती वजनाने खूपच हलकी आहे आणि उत्तम ड्रायव्हिंगची रेंज देण्यासही मदत करते. तिची स्टाइलिंग मुख्यत्वे जुन्या मॉडेलसारखीच आहे, त्याची हॅकनी कॅरेज बॉडीस्टाइल सहज ओळखता येते.

कंपनीनं केले बदलपण कंपनीने नवीन मॉडेलमध्ये काही खास बदलही केले आहेत. यामध्ये फ्रंट साईडला एलईडी रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. नवीन TX ची उंची 4,860mm आहे, जी मागील मॉडेलपेक्षा थोडी अधिक आहे. याशिवाय, त्याची लांबी देखील सुमारे 280 मिमी अधिक आहे. कारमध्ये अधिक जागा स्पेस असेल हे यावरून स्पष्ट होत आहे. कारचा मागील दरवाजा ९० अंशापर्यंत उघडता येतो आणि त्यात एकूण ६ जणांची बसण्याची व्यवस्था आहे.

काय आहे विशेष?आधीच्या मॉडेलमध्ये डिझेल इंजिन देण्यात आलं होतं. परंतु नवीन TX पूर्णपणे इलेक्ट्रिक हायब्रिड प्रणालीवर चालते. यामध्ये कंपनीने व्होल्वोचे 1.5 लिटर क्षमतेचे 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 81hp पॉवर जनरेट करते. या कारमध्ये 33kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो LG Chem कडून घेण्यात आला आहे. हीच कंपनी Hyundai ला त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी देखील पुरवते. या बॅटरीचा वापर Hyundai Kona सारख्या मॉडेल्समध्येही करण्यात आला आहे.

“भारत ही इलेक्ट्रीक वाहनांसाठी एक उदयोन्मुख बाजारपेठ आहे आणि LEVC साठी देशात प्रवेश करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. वाहनाची टेक्नॉलॉजी, अॅस्थेटिक्स येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे," अशी प्रतिक्रिया एक्सक्लुसिव्ह मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सत्य बागला यांनी दिली. मात्र कंपनी ही कार भारतीय बाजारपेठेत कधी प्रवेश करेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :LondonलंडनTaxiटॅक्सीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन