शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

100KM पर्यंत रेंज देणाऱ्या तीन जबरदस्त Electric Scooter लाँच; मिळणार रिव्हर्स मोड, टॉप स्पीडही भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 22:44 IST

Joy e-bike Electric Scooter : पाहा किती आहे या स्कूटर्सची किंमत आणि काय आहे विशेष.

Joy e-bike Electric Scooter : जॉय ई-बाईकने भारतात तीन नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. यामध्ये Wolf+, Gen Next Nano+ आणि Del Go या बाईक्सचा समावेश आहे. कंपनीची Del Go ही डिलिव्हरी इलेक्ट्रीक स्कूटर आहे. तर कंपनीने इतर दोन हाय-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर म्हणून लॉन्च केले आहेत. Wolf+ इलेक्ट्रीक स्कूटर मॅट ब्लॅक, स्टारडस्ट ग्रे आणि डीप वाईन रंगांमध्ये येते. याची किंमत 1,10,185 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. Gen Next Nano+ मिडनाईट ब्लॅक आणि मॅट व्हाईट कलर पर्यायांमध्ये येते. या स्कूटरची किंमत 1,06,991 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Del Go बद्दल सांगायचे झाल्यास, कंपनीने याची किंमत 1,14,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. ही किंमत FAME II सब्सिडीसह आहे. जॉय ई-बाईकच्या या नवीन स्कूटर्सचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटीही देत ​​आहे. स्कूटरची रेंज 100 किमी पर्यंत आहे आणि त्यांचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास आहे.

Wolf+, Gen Next Nanu+ आणि Del Go चे फीचर्सकंपनीची Wolf+ इलेक्ट्रीक स्कूटर टुरिंग डिझाइनसह येते. याचा व्हीलबेस 1345mm आणि सीटची उंची 740mm आहे. त्याच वेळी, Nanu+ च्या सीटची उंची 730mm आणि व्हीलबेस 1325mm आहे. ही स्कूटर प्रामुख्यानं कंपनीने तरुण पिढीसाठी डिझाइन केली आहे. दोन्ही स्कूटरच्या पुढील बाजूस ड्युअल फोर्क हायड्रॉलिक सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. तर, मागील बाजूस मोनो शॉक सस्पेंशन देण्यात येत आहे.

अॅपचीही मदतकंपनीच्या या नव्या इलेक्ट्रीक स्कूटर 160mm च्या ग्राउंड क्लिअरन्स आणि 1.6mm च्या टर्निंग रेडिअससह येतात. Dell Go बद्दल सांगायचं झालं तर या स्कूटरच्या सीटची उंची 820mm आणि व्हीलबेस 1315mm आहे. यात सिंगल स्क्रीन डिटेल डॅशबोर्ड डिस्प्ले देखील आहे. या स्कूटरमध्ये कीलेस स्टार्ट/स्टॉप सुविधा मिळेल. विशेष बाब म्हणजे या स्कूटरमध्ये दिलेले सेन्सर Joy E-connect अॅपद्वारे कंट्रोल केले जाऊ शकतात.

स्कूटरमध्ये मिळतात तीन मोडकम्फर्टेबल राइडसाठी यामध्ये इको, स्पोर्ट्स आणि हायपर रायडिंग मोड देखील मिळतील. यासोबतच कंपनी या दोन्ही ई-स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड देखील देत आहे, जे पार्किंगच्या वेळी अतिशय उपयुक्त पडू शकते. कंपनीची डेल गो डिलिव्हरी ई-स्कूटर जीपीएस सेन्सिंग, रिअल टाईम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग फीचर्सने सुसज्ज आहे आणि याच्या मदतीने स्कूटरला सहज ट्रॅक करता येते. या स्कूटरसोबत कंपनी एक स्मार्ट रिमोट देखील देते. हे फीचर Wolf+ आणि Nano+ मध्ये देखील उपलब्ध आहे. याशिवाय स्कूटर्सना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम मिळते, जे ब्रेक लीव्हर ओढल्यावर बॅटरी चार्ज करते.

कशी असेल बॅटरी ?इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 60V35Ah बॅटरी देण्यात आली आहे. पोर्टेबल असल्याने ही बॅटरी कुठेही चार्ज करता येते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 100 किमी पर्यंतची रेंज देते. या स्कूटरमदध्ये 1500W ची मोटर देण्यात आली असून ती 20Nm टॉर्क आणि 55kmph चा टॉप स्पीड देते. स्कूटरमध्ये बसवलेले ट्विन डिस्क ब्रेक इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीमला जोडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे ब्रेकिंगही चांगले आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड