शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 15:28 IST

टाटा मोटर्सने दणकट नेक्सॉनचे नवीन सनरुफवाले मॉडेल आणल्यानंतर लगेचच धाकड एसयुव्ही हॅरिअरचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. जाणून घ्या काय नवीन फिचर्स आले आहे.

मुंबई : टाटा मोटर्सने दणकट नेक्सॉनचे नवीन सनरुफवाले मॉडेल आणल्यानंतर लगेचच धाकड एसयुव्ही हॅरिअरचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. टाटाने नुकतेच एसयूव्‍ही - हॅरियरचे एक्‍सटी+ व्हेरिअंट बाजारात आणले आहे. या मॉडेलची किंमत १६.९९ लाख रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्येच बीएस ६ इंजिनची हॅरिअर लाँच करण्यात आली होती. 

१६.९९ लाख रूपये ही किंमत सप्‍टेंबर २०२० पर्यंत बुकिंग करणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२० डिलिव्हरी घेण्याऱ्यांसाठी असणार आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे. यामध्ये ग्‍लोबल क्‍लोज, अॅण्‍टी-पिंच फिचर, रेन सेन्सिंग क्‍लोजर, रोलओव्‍हर स्क्रिनसह काचेवर ब्‍लॅक कोटिंग आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Review: टाटाची स्वस्तातली 'रेंज रोव्हर' खरंच साजेशी आहे का? वाचा TATA Harrier कशी आहे...

 

हॅरिअरमध्ये क्रायोटेक २.० डिझेल इंजिन, ६-स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन देण्यात आले आहे. तसेच प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, ड्युअल फंक्‍शन एलईडी डीआरएलएस, आर१७ अलॉय व्‍हील्‍स, फ्लोटिंग आयलँड ७ इंची टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सि‍स्‍टमसह ८ स्‍पीकर्स (४ स्‍पीकर्स + ४ ट्विटर्स), अँड्रॉईड ऑटो अॅण्‍ड अॅप्‍पल कार प्‍ले कनेक्‍टीव्‍हीटी, पुश बटन स्‍टार्ट, फुली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल, रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटो हेडलॅम्‍प्‍स आणि रेन सेन्सिंग वायपर्स देण्यात आले आहेत. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज देण्यात आल्या आहेत. तसेच अ‍ॅडवान्स्ड टेरेन रिस्‍पॉन्‍स मोड्स देखील देण्यात आला आहे. 

TATA Nexon टाटा मोटर्स या भारताच्‍या आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने टाटा नेक्‍सॉनचे एक्‍सएम(एस) व्‍हेरिअंट लाँच केले आहे. ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍याच्‍या, तसेच प्रिमिअम वैशिष्‍ट्ये अधिक किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये कंपनीने आता ८.३६ लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) इलेक्ट्रिक सनरूफ असलेली एक्‍सएम(एस) व्‍हेरिअन्ट आणले आहे. 

Nexon EV आधीपासूनच बाजारात

टाटानं  Nexon EV लॉन्च केली आहे. या कारची किंमत 13.99 लाखांपासून सुरू होईल. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली ही टाटाची पहिली कार असून देशातली सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे. Tata Nexon ची स्पर्धा एमजी ZS EV आणि ह्युंदाई कोनाशी होईल. मात्र या दोन्ही कारची किंमत नेक्सॉनपेक्षा जास्त आहे. टाटा नेक्सॉनच्या ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी कारच्या फ्लोरखाली आहे. पूरपरिस्थितीतही ही बॅटरी सुरक्षित राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरनं 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. तर फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटांमध्ये चार्ज होते. 

टॅग्स :TataटाटाMG Motersएमजी मोटर्स