शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लँड रोव्‍हर डिफेन्डर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By हेमंत बावकर | Updated: October 17, 2020 16:12 IST

LAND ROVER DEFENDER LAUNCHED: लँड रोव्‍हरने या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची जुनी ओळख तशीच ठेवण्यात आली आहे. फ्रण्‍ट व रिअर ओव्‍हरहँग्‍स, अल्‍पाइन लाइट विंडोज, साइड-हिंज रिअर टेलगेट आणि बाहेरील बाजूस माऊंट केलेले स्‍पेअर व्‍हील जुन्या मॉडेलसारखेच ठेवण्यात आले आहे.

लँड रोव्‍हरने भारतीय बाजारात डिफऱेन्डरचे नवे हायफाय मॉडेल लाँच केले आहे. या डिफेन्डरची किंमत 73.98 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. 

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची जुनी ओळख तशीच ठेवण्यात आली आहे. फ्रण्‍ट व रिअर ओव्‍हरहँग्‍स, अल्‍पाइन लाइट विंडोज, साइड-हिंज रिअर टेलगेट आणि बाहेरील बाजूस माऊंट केलेले स्‍पेअर व्‍हील जुन्या मॉडेलसारखेच ठेवण्यात आले आहे. डिफेण्‍डरमध्‍ये पहिल्‍यांदाच नवीन 'पीव्‍ही प्रो' इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, ज्‍यामध्‍ये आकर्षक इंटरफेससह २५.४ सेमी (१० इंच) टचस्क्रिन आणि दर्जात्‍मक तंत्रज्ञान, जसे क्‍लीअर साइट रिअर अॅण्‍ड ग्राऊण्‍ड व्‍ह्यू, ३डी सराऊंड कॅमेरा या सुविधा देते. याचसोबत चार अॅक्सेसरी पॅक एक्‍सप्‍लोरर, अॅडवेन्‍चर, कंट्री व अर्बन देण्यात येत आहेत. 

नव्या डिफेन्डरमध्ये २२१ केडब्‍ल्‍यू (३०० पीएस) शक्‍ती व ४०० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे २.० लिटर टर्बोचार्ज फोर-सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. स्‍पोर्टी ९० (३ दरवाजे) आणि वैविध्‍यपूर्ण ११० (५ दरवाजे) अशी दोन मॉडेल आहेत. डिफेन्डर 90 ची किंमत 73.98 लाखांपासून सुरु होते तर डिफेन्डर 110 ची किंमत 79.94 लाखांपासून सुरु होते. ९ व्‍हील डिझाइन्‍सच्‍या रेंजसह ४५.७२ सेमी (१८ इंच) प्रेस्‍ड स्‍टील रिम्‍स ते ५०.८ सेमी (२० इंच) अलॉइज देखील आहेत.

 फुजी व्‍हाइट, एगर ग्रे, सॅन्‍टोरिनी ब्‍लॅक, इंडस सिल्‍व्‍हर, टेस्‍म्‍न ब्‍ल्यू, पॅनगिआ ग्रीन व गोंडवना स्‍टोन अशा सात रंगांत ती उपलब्ध आहे. सीट फोल्ड केल्यास 2380 लीटर स्पेस मिळते. तर सीट फोल्ड न केल्यास 231 लीटर स्पेस मिळते. 

लँड रोव्हरकडे असलेली रेंजलँड रोव्‍हरच्‍या भारतातील रेंजमध्‍ये रेंज रोव्‍हर इवोक (Range Rover Evoque) (किंमत ५८.६७ लाख रुपयांपासून), डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट (Discovery Sport) (किंमत ५९.९१ लाख रुपयांपासून), रेंज रोव्‍हर वेलार (Range Rover Velar) (किंमत ७३.३० लाख रुपयांपासून), डिस्‍कव्‍हरी (Discovery) (किंमत ७५.५९ लाख रूपयांपासून), रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट (Range Rover Sport) (किंमत ८८.२४ लाख रुपयांपासून) आणि रेंज रोव्‍हर (Range Rover) (किंमत १९६.८२ लाख रुपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. या सर्व किमती भारतातील एक्‍स-शोरूम किमती आहेत.

टॅग्स :Land Roverलँड रोव्हरAutomobileवाहन