कायनेटिक ग्रीन त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कूट येत्या १८ जुलैला भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ही रेट्रो स्टाईलची इलेक्ट्रिक स्कूटर असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाइन १९८० च्या दशकातील स्कूटरसारखे असेल. या इलेक्ट्रीक स्कूटरची पुण्यात चाचणी करण्यात आली. कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चौकोनी हेडलॅम्प, मिनिमलिस्ट साइड पॅनेल आणि एक आकर्षक फ्रंट एप्रन आहे, जे रेट्रो स्कूटरची आठवण करून देते. शिवाय, या स्कूटरमध्ये कायनेटिक लेटरिंगसह बनावट फ्लायस्क्रीन आयताकृती एलईडी रिफ्लेक्टर हेडलाइट्स आणि कायनेटिक लोगोसारखे आकार असलेले टर्न इंडिकेटर देण्यात आले आहे. चांगल्या आणि आरामदायी राइडिंगसाठी स्कूटरमध्ये ड्युअल टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे.
ही स्कटूर जवळपास हिरो विडा, टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक आणि ओला एस१ रेंज सारख्या स्कूटरसारखे दिसते. कायनेटिक वॅट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडने अलीकडेच महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये एका नवीन ईव्ही उत्पादन प्लांटचे उद्घाटन केले, तेच या स्कूटरचे उत्पादन करेल अशी अपेक्षा आहे, जी कायनेटिक ग्रीन व्हर्टिकल अंतर्गत लॉन्च होण्याची शक्यता आहे.