शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

५०० किमीची रेंज, १७ तारखेला होणार ग्लोबल डेब्यू; Kia नं प्रदर्शित केला Electric Car चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 22:12 IST

Kia Electric Car EV9 : सध्या जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सध्या जगभरात इलेक्ट्रीक वाहनांच्या (Electric Vehicles) मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. इंधनाचा पर्याय म्हणून अनेक जण आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांची आवड पाहून अनेक कंपन्या आता इलेक्ट्रीक गाड्यांच्या उत्पादनात उतरल्या आहेत. कोरियातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी कियानं (Kia) आता इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये डेब्यू करण्याची तयारी केली आहे. 17 नोव्हेंबर रोजी कंपनी आपली कॉन्सेप्ट कार EV9 चा ग्लोबल डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. परंतु डेब्यूपूर्वी कंपनीनं अधिकृतरित्या आपली कॉन्सेप्ट EV9 चा टीझल लाँच केला आहे. यामध्ये EV9 ची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. टीझरनुसार या कॉन्सेप्ट EV9 चं एक्सटिरिअर बॉक्सी असल्याचं दिसून येतंय.

कोरियन मार्केटमध्ये, कारचे व्हिज्युअल फीचर्स 'अल्ट्रामॉडर्न एक्सटीरियर डिझाइन' म्हणून पाहिले गेले आहेत. याशिवाय, ही EV एक फ्लॅट रूफलाइन, मोठे व्हिल आर्च, स्लिम LED DRL सेक्शन आणि एक विशेष फ्रंट ग्रिलसह दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीझरमध्ये कारमध्ये कोणत्याही प्रकारचं डोअर हँडल दिसत नाही. यामध्ये एक मोठं हेक्सागॉनल सनरुफ देण्यात आलं आहे. तसंच साईड प्रोफाईलवर अनेक कॅरेक्टर लाईन्स मिळतात. कारच्या आजूबाजूला एलईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. इंटिरियरबद्दल सांगायचं झाल्यास कारच्या केबिनमध्ये कमीतकमी डिझाइन एलिमेंट्स वापरली जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेत बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच EV6 ची विक्री झाली होती. ही इलेक्ट्रीक SUV 400v आणि 800v चार्जिंगला सपोर्ट करते. जर फास्ट चार्जिंगचा वापर केला तर EV6 पाच मिनिटांमध्ये 112 किमी आणि 18 मिनिटांत 330 किमीची रेंज देऊ शकते आसा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कार